Category बातम्या

सोशल मीडियावरून मालवणच्या पर्यटन व्यवसायची बदनामी ; व्यावसायिक आक्रमक 

संबंधित व्यक्तीने जाहीर माफी मागावी, अन्यथा गुन्हा दाखल करण्याचा इशारा मालवण : मालवणच्या पर्यटन व्यवसायाची सोशल मीडियावरून बदनामी करण्याचा प्रकार बुधवारी घडला आहे. त्यानंतर येथील पर्यटन व्यवसायिकांनी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेत सदरील प्रकाराचा निषेध केला आहे. संबंधित व्यक्तीने याबाबतचे…

भजनातून होणारे नामस्मरण पुढील पिढ्यांना दिशादर्शक …

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे प्रतिपादन ; भैरवी देवालयातील भजन महोत्सवाचे उदघाट्न मालवण : देवी भैरवी बाळगोपाळ मित्रमंडळाने सलग तेरा वर्षे भजन सेवेतून देवीची आराधना आणि आशीर्वाद मिळविलेले आहेत. परमेश्वर भेटीचा आनंद भजनात तल्लीन होणाऱ्या भाविकांना होत असतो. आजच्या धकाधकीच्या…

पालकमंत्री नितेश राणे यांनी नवी दिल्लीत घेतली केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट

कोकण रेल्वेच्या विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा ; रेल्वे मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद सिंधुदुर्ग : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन सिंधुदुर्ग व कोकणातील महत्त्वाच्या रेल्वे…

पालकमंत्री नितेश राणेंच्या कल्पकतेची नीती आयोगाने घेतली दखल…

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात नीती आयोगाचे सदस्य सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर भारतातील पहिल्या विकासाच्या “एआय” मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी दौरा सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा आगळावेगळा बनवण्यासाठी सातत्याने…

आनंदव्हाळ उतारावर टेम्पोचा अपघात ; मत्स्यविक्रेत्या महिला किरकोळ जखमी…

मालवण : मालवणहून कणकवलीच्या दिशेने मासे विक्रीसाठी जाणाऱ्या टेम्पोचा मंगळवारी सकाळी आनंदव्हाळ उतारावर अपघात झाला. या अपघातात टेम्पोमध्ये बसलेल्या महिलांना किरकोळ दुखापत झाली. तर टेम्पोच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे टेम्पो चालक गणेश तांडेल आपल्या ताब्यातील…

अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष मंदिरात शारदीय नवरात्र महोत्सवानिमीत्त पारंपारिकरित्या श्री देवीजींची स्थापना व घटस्थापना

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते संपन्न झाली देवीजींची महाआरती अक्कलकोट : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सालाबादाप्रमाणे यंदाही शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त सोमवार दि. २२ सप्टेंबर घटस्थापना ते गुरूवार दि. २ ऑक्टोबर विजया दशमी दसरा…

आगामी जि. प., पं. स. निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण आढावा बैठक संपन्न  सिंधुदुर्ग : राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांच्या अनुषंगाने जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या…

पर्यटन सप्ताहानिमित्त ३ ऑक्टोबरला सिंधुदुर्ग महाविद्यालयात विद्यार्थिनी व महिलांसाठी वेशभुषा स्पर्धा

“वीरांगना – भारतीय स्त्री योद्ध्यांची शौर्यगाथा” या विषयावर होणार स्पर्धा ; महिला विकास कक्ष, सांस्कृतिक विभाग तसेच स्वराज्य महिला ढोल पथक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन मालवण : स. का. पाटील सिंधुदुर्ग कला व वाणिज्य आणि देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालय, मालवण…

कट्टा येथे २ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन

मालवण : भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण व महिला शाखा मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने २ ऑक्टोंबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कट्टा येथे ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन अशोका विजया दशमी…

उत्तराखंड येथील वन व वन्यजीव संवर्धन प्रशिक्षण शिबिरासाठी पत्रकार संदीप बोडवे आणि ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड

मालवण : येथील पत्रकार संदीप बोडवे आणि ॲड ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर यांची सेंट्रल अकादमी फॉर स्टेट फॉरेस्ट सर्व्हिस (CASFOS), डेहराडून उत्तराखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील ३ दिवसीय प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली आहे. २४ ते २६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत आयोजित…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला मोठा दिलासा ; ८९ आरोग्य सेविका महिलांची नियुक्ती

पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या विशेष प्रयत्नांना यश सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला मोठा दिलासा देणारी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर आरोग्य सेविका (महिला) या पदांसाठी झालेल्या पदभरतीला पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य…

एसटीचे पुढील चाक डोक्यावरून गेल्याने वासराचा जागीच मृत्यू 

मालवण शहरातील दुर्दैवी घटना ; मोकाट गुरांचा प्रश्न ऐरणीवर  बस चालकाच्या दुर्लक्षाबरोबरच वासराच्या अज्ञात मालकाविरोधात प्राणी प्रेमींकडून संताप मालवण : गायीच्या वासराच्या डोकीवरून एसटी बसचे पुढील चाक गेल्याने त्या वासराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी मालवण शहरातील पोस्ट…

error: Content is protected !!