Category महाराष्ट्र

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांना ज्ञानदिप पुरस्कार जाहीर

प्रज्ञापूरी कोल्हापूर येथील श्री स्वामी समर्थ मंदीरात १३ मार्च रोजी संपन्न होणार ज्ञानदिप पुरस्कार वितरण शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व रुपये एक लाख असे आहे ज्ञानदिप पुरस्काराचे स्वरुप ; पुरस्काराची रक्कम श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या कार्यासाठी वापरणार – चेअरमन महेश…

महिला दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने उत्कृष्ट काम केलेल्या बँक सखींचा खास सत्कार

सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रधान कार्यालय ओरोस येथे महिला दिन उत्साहात साजरा सिंधुनगरी (प्रतिनिधी) महिला दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रधान कार्यालय ओरोस येथे महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. हर्षदा प्रसाद देवधर यांच्या हस्ते दीपप्रज्वलित करून महिला दिन…

भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्या नेतृत्वाखाली लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी घेतली खा. नारायण राणेंची भेट

मालवण : भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीयमंत्री खासदार नारायण राणे यांची भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्यासह नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील विजयी लोकप्रतिनिधींनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. क्षमा संदीप हडकर, पंचायत समिती गटनेते…

पालकमंत्री ना. नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर ; जनतेच्या घेणार भेटी

कणकवली : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवार ७ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे असेल. मुंबईहून दुपारी २.३० वाजता मोपा विमानतळ येथे आगमन होईल.…

आ. निलेश राणे यांच्या माध्यमातून राज्य अर्थसंकल्पातून कुडाळ मालवण मतदार संघात २५ कोटींचा निधी मंजूर

कुडाळ मालवण, पणदूर घोटगे, कसाल मालवण, तळाशील तोंडवळी सारख्या महत्वाच्या रस्त्यांसाठी कोट्यावधींचा निधी मुंबई : आमदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे राज्य अर्थसंकल्पातुन कुडाळ मालवण मतदार संघातील रस्ते दुरुस्ती व पूल बांधकाम करणे या कामांसाठी एकूण २५ कोटींचा निधी मंजूर…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामुळे मत्स्यव्यवसाय व बंदरे क्षेत्राला नवी गती

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसाठी अर्थसंकल्पात १,२४० कोटींची तरतूद ; मुंबईतील जलवाहतूक क्षेत्रासाठी ६,६०० कोटींची तरतूद मुंबई : मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आर्थिक वर्ष २०२६-२७ चा राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, कष्टकरी, मजूर, मच्छीमार बांधव, महिला…

सिंधुरत्न समृद्ध योजनेला मुदतवाढ ; जिल्ह्याच्या विकासाला आणखी चालना मिळणार

पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार दिपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश : मंत्री नितेश राणेंकडून मुख्यमंत्र्यांचे आभार मुंबई (प्रतिनिधी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प कोकणसाठी महत्वाचा ठरला असून विकासासाठी महत्वाच्या ठरलेल्या सिंधुरत्न समृद्ध योजनेला तीन वर्षांची मुदतवाढ देण्यात…

‘१०० शिल्पा कवितां’चे श्रेय झाटये कुटुंबीय व माझ्या सर्व स्टाफचे… !

डॉ. शिल्पा झाटये यांचे प्रतिपादन ; १०० इंग्रजी कवितांच्या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन पुस्तकातील निवडक कवितांचा संग्रह काढून मालवणातील वाचनालयांना मोफत देण्याचा मानस मालवण | कुणाल मांजरेकर येथील प्रख्यात स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. शिल्पा झाटये यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘१०० शिल्पा…

अमेरिका-इराण युद्ध परिस्थितीमुळे निर्यात व्यवस्थेवरील परिणाम कमी करण्यासाठी राज्य सरकारचा केंद्राशी समन्वय

मंत्री नितेश राणे यांची विधानसभेत माहिती : शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न मुंबई : अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या आंतरराष्ट्रीय तणावाचा परिणाम राज्यातील निर्यात व्यवस्थेवर होऊ नये यासाठी राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास मत्स्यव्यवसाय व बंदरे…

कणकवली ठाकरे शिवसेना शाखेत ६ मार्च रोजी तिथीप्रमाणे शिवजयंती

कणकवली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवली येथील शिवसेना शाखेत शुक्रवार दि. ६ मार्च रोजी तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सकाळी ९ वाजता श्री…

सिंधुदुर्गात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी (जिमाका) : मध्यपूर्व आशिया तसेच आखाती देशांमध्ये सध्या सुरु असलेल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व घाबरून…

M2M Ferry | अशोक सावंत यांनी केला मंत्री नितेश राणेंचा सत्कार 

पालकमंत्री नितेश राणेंच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच कोकणवासियांचे बहुप्रतीक्षित स्वप्न साकार पर्यटनाला होणार फायदा ; नजिकच्या काळात बोटफेरीचा मालवण, वेंगुर्ला पर्यंत विस्तार व्हावा : अशोक सावंत यांची अपेक्षा मालवण | कुणाल मांजरेकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि राज्याचे मत्स्य व बंदरे…

error: Content is protected !!