Category महाराष्ट्र

“जनतेची सेवा करत राहा, जनता योग्य नेता निवडेल”

आमदार प्रमोद जठार यांचा युवा नेते विशाल परब यांना सल्ला विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ल्यात भव्य मोफत महाआरोग्य शिबिर; हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आशा सेविकांचा सन्मान, प्राथमिक आरोग्य केंद्रांना PPE किटचे वाटप; विधानसभा मतदारसंघात ‘वैकुंठ रथ’चा सामाजिक उपक्रम वेंगुर्ला :…

चिवला बीच रस्त्याच्या कामाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड; आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नांना यश

मालवणमध्ये प्रथमच Ajax मशीनद्वारे M30 मिक्स डिझाईन काँक्रिटचा वापर उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्यासह महायुतीच्या नगरसेवकांकडून पाहणी; दर्जेदार कामाबाबत स्थानिकांकडून समाधान मालवण | कुणाल मांजरेकर मालवणच्या पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या चिवला बीच परिसरातील रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सुरू झाले आहे. कुडाळ-मालवणचे…

जलसंधारणाला जिल्हा बँकेचे बळ; २५ हजार पिशव्यांचे वितरण

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा पुढाकार; वनराई बंधाऱ्यांच्या कामांना मिळणार गती सिंधुनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांना गती देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यात वनराई बंधारे उभारण्यासाठी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी २५ हजार पिशव्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष…

भजनातून संस्कार, अध्यात्मातून समाजाची एकजूट

मालवणच्या भजन महोत्सवात शिवसेना जिल्हाप्रमुख, उद्योजक दत्ता सामंत यांचे प्रतिपादन; दत्ता सामंत यांचा ‘समाज भूषण’ पुरस्काराने सन्मान मालवण : भजन ही केवळ करमणुकीची कला नसून संस्कृती, परंपरा आणि अध्यात्माचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणारे प्रभावी माध्यम आहे. भजनातून समाजाला चांगले विचार,…

युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त मळेवाड येथे पहिल्या मोफत महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ

जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते उद्घाटन; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सावंतवाडी : भाजपा युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या वाढदिवसानिमित्त मळेवाड येथे आयोजित पहिल्या मोफत महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि सावंतवाडी नगरपरिषदेचे…

कट्टर राणे समर्थक राजू बिडये यांच्याकडे शिवसेनेच्या मालवण शहरप्रमुखपदाची धुरा

आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत नियुक्तीची घोषणा; शहरात संघटनात्मक बळ वाढविण्याचे आव्हान मालवण : कट्टर राणे समर्थक तथा येथील सामाजिक कार्यकर्ते, युवा उद्योजक राजू बिडये यांची शिवसेनेच्या मालवण शहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता…

मालवण बीचवर उद्या भक्तिसंगीताची स्वरमयी मैफल; ‘देवधून’ संगीत रजनीचे आयोजन

रविवारी सायंकाळी ७.३० वाजता कार्यक्रम; भक्तिरसाचा अनुभव घेण्याची रसिकांना संधी मालवण | कुणाल मांजरेकर मालवण बीच कला महोत्सवाच्या निमित्ताने रविवारी ११ ऑक्टोबर सायंकाळी ७.३० वाजता ‘देवधून – भक्तिरस, एक अद्भुत संगीत रजनी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समुद्रकिनाऱ्याच्या…

मालवणात बीच लोककला महोत्सवाचे उद्घाटन; नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते शुभारंभ

पहिल्या दिवशी दशावतार नाट्यप्रयोग; आमदार निलेश राणे यांची कार्यक्रमस्थळी भेट मालवण | कुणाल मांजरेकर महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या ‘बीच लोककला महोत्सवा’चे उद्घाटन शनिवारी (ता. १०) सायंकाळी मालवणच्या नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते झाले. मालवण बंदर जेटी…

पाणीटंचाईच्या संकटात कागदपत्रांच्या नावाखाली अडवणूक नको : आमदार निलेश राणेंच्या सक्त सूचना

१५४ बंधाऱ्यांपैकी केवळ ३६ बंधाऱ्यांत योग्य पाणी अडवणूक; लघु पाटबंधारे विभागाच्या कामकाजावर तीव्र नाराजी मालवण : जिल्ह्यात दुष्काळ आणि पाणीटंचाईचे संकट गडद होत असताना नागरिकांना शासकीय कागदपत्रांच्या नावाखाली अडवणूक करू नका. सरसकट पंचनामे करून बाधितांना तातडीने मदत पोहोचवा. अधिकाऱ्यांचा निष्क्रियपणा…

चिवला बीच रस्त्याच्या दर्जेदार कामाबाबत बांधकाम सभापतींच्या सक्त सूचना

चिवला बीच रस्ता दुरुस्ती कामाची बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर व आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांच्याकडून पाहणी कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तक्रार नको; टिकाऊ कामावर भर द्या मालवण : पर्यटक आणि स्थानिक नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या चिवला बीच परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्ती व…

सागरी पर्यावरणाची हानी करणाऱ्या चिवला बीचवरील दोन हॉटेलांवर कारवाई

मनसेने प्रकार आणला निदर्शनास; कोकण मिररने वेधले होते पर्यावरणाच्या हानीकडे लक्ष नगरपालिका प्रशासनाची तातडीने कारवाई ; बांधकाम सभापती, आरोग्य सभापतींकडून पाहणी मालवण | कुणाल मांजरेकर मालवणच्या चिवला बीचवर हॉटेलमधून थेट समुद्रकिनारी सांडपाणी सोडण्याचा गंभीर प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष गॅरी…

पाणीटंचाईच्या बैठकीवरून वैभव नाईकांची राजकीय फडफड; दत्ता सामंतांचा घणाघाती हल्लाबोल

“दहा वर्षांचा हिशेब द्या, उगाच तारखांच्या बदलाचा बाऊ करू नका” मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील पाणीटंचाई आढावा बैठकीच्या नियोजनावरून माजी आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या टीकेला शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे. “दुष्काळावर राजकारण करण्यापूर्वी वैभव…

error: Content is protected !!