Category बातम्या

मालवण तालुका पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर ; ४ जानेवारीला मसुरेत पुरस्कार वितरण

आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती ; श्रीगणेश गावकर, सुधीर पडेलकर, प्रशांत हिंदळेकर यांच्यासह डॉ. ज्योती तोरसकर, निलेश गवंडी यांचा होणार सन्मान मालवण : मालवण तालुका पत्रकार समितीचे वार्षिक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत…

ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी घेतली नूतन तहसीलदार गणेश लव्हे यांची सदिच्छा भेट

मालवण : येथील नूतन तहसीलदार म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल गणेश लव्हे यांचे आज ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आले. पक्षाच्या प्रमुख नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयात जाऊन लव्हे यांची भेट घेत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक मंदार…

नगराध्यक्षा ममता वराडकर व नवनिर्वाचित नगरसेवकांचा भंडारी समाजाच्या वतीने ४ जानेवारी रोजी मालवणात सत्कार

मालवण : सकल भंडारी हितवर्धक संस्था मालवण आणि भंडारी ज्ञाती बांधवांच्या वतीने मालवणच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवकांचा नागरी सत्कार सोहळा ४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मालवण भरड येथील लीलांजली हॉल येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.…

शिवसेनेच्या नगराध्यक्षांसह अन्य १० नगरसेवकांनी स्थापन केली ‘श्रीदत्त रामेश्वर शहर विकास आघाडी’

गटनेत्या म्हणून पूनम चव्हाण यांची नियुक्ती मालवण : उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या थेट नगराध्यक्षांसह १० नगरसेवकांनी एकत्र येत श्रीदत्त रामेश्वर शहर विकास आघाडी या गटाची स्थापना केली आहे. या गटाच्या गटनेते पदी प्रभाग ४…

नगरसेवक सहदेव बापर्डेकर यांच्या पुढाकाराने राजकोट किल्ल्यावर ‘बायो टॉयलेट’ सुविधा

पालिकेच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या बायो टॉयलेटची स्वखर्चाने जोडणी ; पर्यटकांची गैरसोय थांबणार… मालवण : येथील ऐतिहासिक राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटक गर्दी करत आहेत. मात्र, या ठिकाणी स्वच्छतागृहांची सुविधा नसल्याने पर्यटकांची मोठी गैरसोय होत…

पी. प्रदीप यांच्याकडे मत्स्यव्यवसाय आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे हे आज ३१ डिसेंबर रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. श्री. तावडे यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणाऱ्या आयुक्त मत्स्यव्यवसाय या पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. प्रदिप पी., मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई यांच्याकडे…

मालवण नगरपालिकेत भाजप नगरसेवकांचा गट स्थापन ; गटनेतेपदी सौ. अन्वेशा आचरेकर यांची निवड

मालवण शहर विकास समिती नावाने गटाची स्थापना मालवण : मालवण नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेवकांचा मालवण शहर विकास समिती या नावाचा गट स्थापन करण्यात आला आहे. या गटाच्या गटप्रमुख म्हणून प्रभाग ९ च्या नगरसेविका सौ. अन्वेषा अजित…

हम भी कुछ कम नही… ! शिवसेनेच्या महिला नगरसेविका नागरी सोयीसाठी स्वतः रस्त्यावर

आडवण-वायरी परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रभाग १० च्या नगरसेविका भाग्यश्री मयेकर यांची तत्परता नगरसेवक दीपक पाटकर यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांचे सहकार्य मालवण | कुणाल मांजरेकर यंदाच्या मालवण नगरपालिका निवडणुकीत आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वात शिवसेनेने…

मालवणात नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार

श्री गणेश नागरी सहकारी संस्था मालवण व मालवणी बाजारच्यावतीने सत्काराचे आयोजन मालवण : श्री गणेश नागरी सहकारी संस्था मालवण आणि मालवणी बाजार संस्थेचे संस्थापक व कागलच्या राजे करमसिंह घाटगे को-ऑप. बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील व बामणी गावच्या लोकनियुक्त सरपंच…

अनधिकृतरित्या मासेमारी करणाऱ्या कर्नाटक राज्यातील मासेमारी नौकेवर कारवाई

मत्स्यव्यवसाय विभागाकडून मालवणच्या समुद्रात कारवाई मालवण : मत्स्यव्यवसाय विभाग, सिंधुदुर्ग यांच्या वतीने महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८९ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत परप्रांतीय नौकेवर कारवाई करण्यात आली आहे. २५ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ८.१५ च्या सुमारास मालवण समोर समुद्रात…

अनधिकृत वाळू वाहतूक करणारे गोव्यातील ६ डंपर मालवणातून ताब्यात

स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तहसील व मालवण पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून कारवाई मालवण : शहरातील सागरी महामार्ग येथे हॉटेल आराध्य नजिक काल मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास तहसिलदार मालवण व पोलिस निरीक्षक मालवण यांनी नेमलेल्‍या संयुक्‍त पथकाने स्‍थानिक ग्रामस्‍थांच्‍या मदतीने अनधिकृत वाळू वाहतूक…

मालवणच्या पहिल्या महिला लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी पदभार स्वीकारला

नूतन नगराध्यक्षांचा पदभार सोहळा दिमाखात ; पुष्पवृष्टी व फटाक्यांच्या आतषबाजीत नगराध्यक्षांचे जल्लोषी स्वागत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांसह नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी व नागरिकांची मोठी उपस्थिती मालवण : प्रतिष्ठेच्या लढतीत मोठ्या बहुमताने निवडून आलेल्या मालवण नगरपरिषदेच्या पहिल्या लोकनियुक्त महिला नगराध्यक्ष शिवसेनेच्या…

error: Content is protected !!