Category राजकारण

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोमवारी कुडाळात शिवसेना-महाविकास आघाडीचे आंदोलन

माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रांताधिकाऱ्यांना देणार निवेदन; पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मालवण : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यशैलीवर आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांवर इतर दोन निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि…

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या संघटनात्मक बांधणीवर मंथन

आमदार प्रमोद जठार यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन; बूथस्तरापासून पक्षविस्तारावर भर रत्नागिरी : आगामी काळातील संघटनात्मक कामकाज अधिक प्रभावी करण्यासोबतच बूथस्तरापासून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी भाजपने रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात चिंतनाला सुरुवात केली आहे. भारतीय जनता पार्टी रत्नागिरी दक्षिण जिल्हा २६६-रत्नागिरी…

खेडच्या राजाच्या चरणी आमदार प्रमोद जठार नतमस्तक; विधिवत पूजा अन् महाआरती संपन्न

गणरायाच्या चरणी नतमस्तक होत सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी केली प्रार्थना; भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती खेड : आमदार प्रमोद जठार यांनी आज खेडच्या राजाचे मनोभावे दर्शन घेत विधिवत पूजा व महाआरती केली. गणरायाच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी सर्वांच्या सुख-समृद्धीसह महाराष्ट्राच्या कल्याणासाठी…

कुडाळ-मालवणात ९ तलाठी कार्यालयांना मिळणार हक्काची इमारत

आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून १ कोटी ४८ लाखांचा निधी मंजूर मालवण : कुडाळ आणि मालवण तालुक्यातील जीर्ण झालेल्या तसेच स्वतंत्र तलाठी कार्यालयाची इमारत उपलब्ध नसलेल्या तलाठी सजांसाठी आता मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. आमदार…

राजा गावकर यांचा शिवसेनेतील पदांचा राजीनामा

मच्छीमार आघाडी जिल्हाप्रमुख आणि जिल्हा प्रवक्तेपदाचा त्याग; आमदार निलेश राणेंकडे सुपूर्द केले पत्र मालवण : शिवसेनेचे सिंधुदुर्ग मच्छीमार आघाडी जिल्हाप्रमुख तथा जिल्हा प्रवक्ते राजेंद्र उर्फ राजा गावकर यांनी आपल्या दोन्ही पदांचा राजीनामा दिला आहे. आपल्या राजीनाम्याचे पत्र त्यांनी कुडाळ-मालवण मतदारसंघाचे…

नगरपालिकेच्या ताब्यातील गोवंशाच्या देखभालीवर गंभीर प्रश्न!

वासराच्या मृत्यूनंतर गायीचाही मृत्यू ; मनसेचा खळबळजनक आरोप, मुख्याधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी मालवण : मालवण नगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या गोवंशाच्या देखभालीबाबत गंभीर निष्काळजीपणा होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. नगरपालिकेच्या ताब्यातील एका गायीने वासराला जन्म दिल्यानंतर योग्य अन्न-पाणी व आवश्यक…

बॅनरचा विपर्यास करून आमदार निलेश राणेंची बदनामी; युवासेनेची आचरा पोलिसांतही तक्रार

मालवण : श्रावण गवळीवाडी येथे ग्रामस्थांनी लावलेल्या बॅनरचा विपर्यास करून त्याचा संबंध आमदार निलेश राणे यांच्याशी जोडत सोशल मीडियावर बदनामी केल्याचा आरोप करत युवासेना तालुकाप्रमुख अभिमन्यू अर्जुन लाड यांनी संबंधिता विरोधात आचरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यावर तातडीने…

मूळ बॅनरला एडिटिंगचा मुलामा; आ. निलेश राणेंचे नाव घुसवून बदनामीचा डाव

श्रावण गवळीवाडीतील बॅनर प्रकरणाने खळबळ; युवासेना आक्रमक, प्रितम गावडे यांची मालवण पोलिसांत तक्रार मालवण : श्रावण गवळीवाडी येथे ग्रामस्थांनी लावलेल्या बॅनरचा कथितरित्या विपर्यास करून त्यामध्ये आमदार निलेश राणे यांचे नाव जोडत सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला…

संघटन बळकटीसाठी गावागावात उतरा; जनतेशी नाळ घट्ट करा…

लांजा-राजापूर विधानसभा चिंतन बैठकीत आमदार प्रमोद जठार यांचे कार्यकर्त्यांना आवाहन; रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन कासार्डे : आगामी काळातील संघटनात्मक आव्हाने आणि पक्षाचा जनाधार अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची चिंतन बैठक कासार्डे येथील अभिषेक…

‘रवी’तेजाला ‘विशाल’ सलाम! गुरूंच्या चरणी शिष्याची राजकीय निष्ठा

भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल परब यांची मुंबईत प्रत्यक्ष भेट; शुभेच्छांसोबत गुरु-शिष्य नात्याचा जिव्हाळा अधोरेखित मुंबई : महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील युवा नेतृत्व म्हणून सक्रिय असलेले भाजप नेते विशाल…

तुम्ही जेवढं तोंड उघडाल, तेवढंच आदित्य ठाकरे अडचणीत येतील…

मंत्री नितेश राणेंचा संजय राऊतांवर घणाघाती हल्ला दिशा सालियन प्रकरणात राजकारण नको; ही एका बापाची मुलीसाठीची लढाई मुंबई : दिशा सालियन मृत्यूप्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असताना राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी…

श्रद्धेच्या वास्तूला विकासाची नवी दारे…

काशीकल्याणी ब्राह्मण मंदिराच्या नूतन प्रवेशद्वाराचे युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते भूमिपूजन वेंगुर्ला : अध्यात्म, संस्कृती आणि सामाजिक एकोपा यांचा वारसा जपणाऱ्या आरवली-बागकरवाडी येथील काशीकल्याणी ब्राह्मण मंदिराच्या नूतन प्रवेशद्वाराच्या बांधकामाचा शुभारंभ भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते भूमिपूजनाने करण्यात…

error: Content is protected !!