Category राजकारण

गोकुळच्या सत्तासंघर्षात मोठा ट्विस्ट! सरकारच्या निर्णयाने सत्तेचे गणित बदलणार?

सतेज पाटील यांचा निर्णयाला विरोध, उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा इशारा कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या सत्तासंघर्षात आज, ४ नोव्हेंबर रोजी मोठी राजकीय घडामोड घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठी उलाढाल…

दहा महिने सत्तेत, तरी नळपाणी योजनेचा आढावा घेण्यासाठी विशेष सभा लावण्यास टाळाटाळ का ?

ठेकेदार आणि PMC च्या कामावर नगरसेवक मंदार ओरसकर यांच्याकडून प्रश्नचिन्ह काम योग्य असेल तर माहिती देण्यास अडचण कसली? ठेकेदाराच्या मनमानीला सत्ताधाऱ्यांचा मूक पाठिंबा आहे का? मालवण : शहरातील नळपाणी पुरवठा योजनेवरून सत्ताधारी महायुतीचे नगरसेवक व ठाकरे शिवसेना नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप…

चिपळुणात भाजपची ‘राष्ट्रचिंतन बैठक’ उत्साहात!

‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ अभियानाला पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आमदार प्रमोद जठार यांची प्रमुख उपस्थिती; संघटन बळकटीकरणाचे केले आवाहन चिपळूण : भाजपच्या ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ अभियानांतर्गत रत्नागिरी दक्षिण जिल्ह्याची राष्ट्रचिंतन बैठक चिपळुणात उत्साहात पार पडली. जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव…

घुसखोरीला थारा नको; लोकशाहीला धोका नको

युरोपातील अस्थिरतेचा दाखला देत मंत्री नितेश राणे यांचा सावधानतेचा इशारा ‘राष्ट्र चिंतन संवाद’ कार्यक्रमात घुसखोरी, अंतर्गत सुरक्षा आणि मतदार यादी शुद्धीकरणावर परखड भूमिका ‘रिजीम चेंज’ची भाषा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान नाकारण्याची भाषा! कणकवली : युरोपातील प्रगत देशांमध्ये महागाई,…

आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत चिपळूणमध्ये भाजपमध्ये मोठी इनकमिंग!

अनुराग उतेकर यांच्यासह शेकडो युवक-युवती, सरपंच आणि ग्रामस्थांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश चिपळूण : चिपळूण तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला चालना देणारी महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली आहे. सामाजिक कार्यकर्ते अनुराग उतेकर यांच्यासह शेकडो युवक-युवती आणि ग्रामस्थांनी आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत…

गोकुळ अध्यक्षपदाचा फैसला १० नोव्हेंबरला!

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा महत्त्वपूर्ण आदेश; सकाळी ११ वाजता पुन्हा सभा घेण्याचे निर्देश कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाचा तिढा अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा एकदा निर्णायक वळणावर आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर…

विरोधकांच्या आरोपांची उपनगराध्यक्ष दीपक पाटकरांकडून पोलखोल!

मालवणच्या विकासात अडथळे आणणाऱ्यांना जशास तसे उत्तर देणार; उबाठा गटावर जोरदार निशाणा नळपाणी योजनेसह सर्व विकासप्रकल्प दर्जेदार आणि गतिमान पद्धतीने पूर्ण करण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध; आमदार निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली विकासाला नवी दिशा मालवण : मालवण शहरातील नव्या नळपाणी योजनेसह विविध विकासकामांवरून…

‘मत वाचवा – देश वाचवा’ अभियानासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते दिल्लीला रवाना!

मतचोरीविरोधातील लढ्याला पाठिंबा; रामलीला मैदानावरील रॅलीत जिल्हा काँग्रेसचा सहभाग सिंधुदुर्ग : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवार, १ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या ‘मत वाचवा – देश वाचवा’ अभियानांतर्गत भव्य रॅलीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते…

शिवराय सेक्युलर नव्हे, कट्टर हिंदुत्ववादीच!

कुडाळमध्ये पालकमंत्री नितेश राणेंचे परखड प्रतिपादन; हिंदू एकजुटीचे आवाहन कुडाळ : छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलर नव्हते, तर हिंदुत्ववादी होते. महाराजांचा खरा इतिहास प्रत्येक हिंदूने वाचला पाहिजे. हिंदू समाजाने एकजूट आणि जागृत राहण्याची आज गरज आहे. आपला सिंधुदुर्ग जिल्हा हिंदूमय…

कांदळगावात ठाकरे गटाला मोठा धक्का!

सरपंच, उपसरपंचांसह अनेकांचा निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश हडी आणि कोळंबमधील युवकांचाही शिवसेनेत पक्षप्रवेश रखडलेली विकासकामे मार्गी लावण्याचा आमदार निलेश राणेंचा शब्द मालवण : कांदळगावात ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून, उबाठा गटाचे सरपंच रणजित परब, उपसरपंच राजेंद्र कदम…

“शिंदेसाहेबांवर बोलताना लायकीत राहायचं!”

विधान परिषद निवडणुकीतील पराभवावरून भाजप-शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप; X पोस्टमधून आमदार निलेश राणेंचा नवनाथ बन यांच्यावर थेट हल्ला मुंबई : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीला पाचपैकी केवळ दोन जागा मिळाल्यानंतर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले…

मालवणच्या नळपाणी योजनेवरून पालिकेच्या विशेष सभेत रणकंदन!

विरोधकांच्या उपसूचनेचा ४ विरुद्ध १४ मतांनी पराभव; बहुमताच्या जोरावर सत्ताधाऱ्यांचा ठराव मंजूर मालवण : मालवण शहराच्या महत्त्वाकांक्षी नळपाणी योजनेच्या सुधारित अंदाजपत्रकावरून मालवण नगरपालिकेतील राजकीय वातावरण सोमवारी चांगलेच तापले. शहरवासीयांच्या जिव्हाळ्याच्या पाणीप्रश्नावर आयोजित विशेष सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.…

error: Content is protected !!