Category News

मालवण खरेदी विक्री संघात भाजपाचा विजय निश्चित : निलेश राणेंचा विश्वास

खरेदी विक्री संघाचे प्रश्न सोडवण्यास भाजपा सक्षम ; आता विजयाची औपचारिकता मालवण | कुणाल मांजरेकर राज्यात भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे भविष्यात खरेदी विक्री संघाचे प्रश्न सोडवण्यास आम्ही सक्षम आहोत. मालवण खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत आम्ही जबाबदार उमेदवार रिंगणात उतरवले असून…

कुडाळात व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला ; हल्लेखोर ताब्यात

कुडाळ : कुडाळ एमआयडीसीतील व्यापारी चंदु पटेल यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे. त्यांना तातडीने कुडाळ येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. सदर हल्ल्यानंतर कुडाळ पोलीस स्टेशन समोर गर्दी झाली होती. हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र…

मालवण खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत भाजपा विरोधात महाविकास आघाडीत थेट लढत

२५ जणांची माघार ; १५ जागेसाठी ३१ उमेदवार रिंगणात मालवण : येथील तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २५ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. ३१ उमेदवार निवडणूक रिंगणात असून महाविकास…

अंतोन आल्मेडा यांच्या मृत्यू प्रकरणी पाच जणांवर गुन्हा ; तीन जण अटकेत

दोघेजण फरार ; अटकेतील आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी मालवण | कुणाल मांजरेकर मालवण येथे समुद्रात मासेमारीसाठी गेल्यानंतर १३ ऑक्टोबरपासून बेपत्ता असलेल्या खलाशी अंतोन सालू आल्मेडा (३८, रा. रेवतळे मालवण) यांच्या मृत्यू प्रकरणी मालवण पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला…

मंगळसूत्र चोरटा कणकवली पोलिसांच्या ताब्यात ; दोन दिवसांची पोलीस कोठडी

कणकवली : फोंडाघाट बाजारपेठेतील दुकानदार महिलेला बोलण्यात गुंतवुन ठेवून तिच्या गळ्यातील ६० हजार किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र हातचलाखीने लांबवून नेल्याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी कुडाळ न्यायालयाकडून ताब्यात घेऊन अटक केली आहे. हसन नासिर हुसेन उर्फ इरानी (४८, बिदर कर्नाटक) असे आरोपीचे नाव आहे.…

वेंगुर्ल्यात ८,९ नोव्हेंबरला पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी चाचणी परीक्षा

वेंगुर्ला : माजी विद्यार्थी संघ – न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा, अभिनव फाउंडेशन, सावंतवाडी आणि किरात ट्रस्ट, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला येथे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात येत आहेत. या प्रशिक्षण वर्गासाठी ३० मुला मुलींची निवड करून त्यांना शास्त्रशुद्ध…

विक्रोळीच्या पर्यटकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

देवबाग येथील घटना ; पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद मालवण : देवबाग येथे पर्यटनासाठी आलेल्या अशोक शांताराम आरेकर (वय-६५) रा. विक्रोळी मुंबई यांचा हृदयविकाराच्या झटक्याने काल रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १७ नोव्हेंबरपर्यंत मनाई आदेश जारी

सिंधुदुर्गनगरी, दि. 2 (जि.मा.का) : जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी. यासाठी जिल्हाधिकारी के. मजुलक्ष्मी यांनी, त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37…

सर्व्हर डाऊनमुळे धान्यापासून वंचित राहिलेल्या रेशन ग्राहकांना धान्य वितरणासाठी मुदतवाढ द्या

भाजपा नेते, माजी खा. निलेश राणे यांनी वेधले जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे लक्ष मालवण : सर्वर डाऊन असल्याने रेशन धान्य वितारण करण्यात मागील ऑक्टोबर महिन्यात मोठी समस्या निर्माण झाली. महिना संपला तरी अनेक ग्राहकांना धान्य मिळाले नाही. याबाबत ग्राहकांनी माजी…

चिपी विमानतळावरील अवाजवी भाडेवाढीकडे ना. राणेंनी वेधलं केंद्रीय नागरी उड्डयनमंत्र्यांचं लक्ष

विमानतळा वरून शासकीय नियमाप्रमाणे भाडे आकारण्याची केली मागणी सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून विमानसेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या कारभाराबाबत केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री ज्योतीरादित्य सिंधिया यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. या…

error: Content is protected !!