कुडाळात व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला ; हल्लेखोर ताब्यात

कुडाळ : कुडाळ एमआयडीसीतील व्यापारी चंदु पटेल यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे. त्यांना तातडीने कुडाळ येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. सदर हल्ल्यानंतर कुडाळ पोलीस स्टेशन समोर गर्दी झाली होती. हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र हा हल्ला नेमका कोणत्या कारणाने झाला हे स्पष्ट झाले नाही.

या हल्ल्यात पटेल यांना मोठी दुखापत झाली आहे. त्यांच्या तोंडावर देखील मोठ्या प्रमाणात हल्लेखोराने हल्ला केला असल्याचे पहावयास मिळते. हल्लेखोर हा परप्रांतीय मजूर असून तो मनोरुग्ण असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा हल्लेखोर कुडाळ येथे भाड्याने राहतो. हल्लेखोरावर कठोर कारवाई करून त्यांना हद्दपार करण्यात यावे अशी मागणी पोलीस ठाण्याच्या आवारात जमलेल्या नागरिकांमधून होत आहे. जखमी पटेल यांना कुडाळ येथील सामाजिक कार्यकर्ते तथा मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब, भाजपच्या संध्या तेरसे,आनंद बांदिवडेकर,लालू पटेल यांनी अधिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!