Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

मालवणच्या नळपाणी योजनेवरून पालिकेच्या विशेष सभेत रणकंदन!

विरोधकांच्या उपसूचनेचा ४ विरुद्ध १४ मतांनी पराभव; बहुमताच्या जोरावर सत्ताधाऱ्यांचा ठराव मंजूर मालवण : मालवण शहराच्या महत्त्वाकांक्षी नळपाणी योजनेच्या सुधारित अंदाजपत्रकावरून मालवण नगरपालिकेतील राजकीय वातावरण सोमवारी चांगलेच तापले. शहरवासीयांच्या जिव्हाळ्याच्या पाणीप्रश्नावर आयोजित विशेष सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.…

मच्छीमारांना स्वावलंबी बनवणे हेच सरकारचे ध्येय : ना. नितेश राणे

वेंगुर्ल्यात देशातील पहिले बहुप्रजाती मत्स्यबीज केंद्र उभारणार; NABARD कडून मत्स्य व्यवसायासाठी १,००० कोटींची तरतूद सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी मच्छीमारांना राज्याच्या मदतीवर अवलंबून न ठेवता स्वतःच्या पायावर उभे करणे, मत्स्य व्यवसायाला आर्थिक बळ देणे आणि कोकणातील मच्छीमारांना जागतिक बाजारपेठेत संधी उपलब्ध करून…

मालवणमध्ये भटक्या कुत्र्यांविरोधात नगरपरिषदेची धडक मोहीम

पहिल्याच टप्प्यात २०० कुत्र्यांचे निर्बीजीकरण अन् लसीकरण पूर्ण; नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन मैदानात मालवण : शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येचा प्रश्न ऐरणीवर असतानाच मालवण नगरपरिषदेने आता ठोस पाऊल उचलले आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासह नागरिकांची सुरक्षितता आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने…

तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून तातडीने पाहणी

१२ ते १५ लाखांचे नुकसान; पंचनामा पूर्ण करून अर्थसाहाय्यासाठी कार्यवाही सुरू मंत्री नितेश राणे यांचे नुकसानग्रस्त मच्छीमारांना तातडीने मदत देण्याचे निर्देश मालवण | प्रतिनिधी तारकर्ली येथील श्री महापुरुष कांदळगावकर रापण संघाच्या पारंपरिक मासेमारी नौकेला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले असून,…

सावंतवाडीत भाजयुमोच्या वतीने भव्य बॉडी बिल्डिंग आणि नरकासुर स्पर्धांचे आयोजन

१ नोव्हेंबरला बॉडी बिल्डिंगचा थरार; ७ नोव्हेंबरला नरकासुर स्पर्धेची रंगत सावंतवाडी | प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, सावंतवाडी विधानसभा क्षेत्राच्या वतीने दीपावलीनिमित्त युवकांच्या शारीरिक तंदुरुस्तीला, क्रीडाभावनेला आणि पारंपरिक संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी भव्य बॉडी बिल्डिंग स्पर्धा आणि नरकासुर स्पर्धेचे आयोजन…

कोजागिरीच्या रात्री चोरट्यांचा मालवणात धुमाकूळ! आठ बंगले फोडले

कट्टा काराणेवाडीतील निसर्ग निवास चोरट्यांचा लक्ष्यबिंदू; सीसीटीव्हीत संशयित कैद, परप्रांतीय कामगार चौकशीसाठी ताब्यात मालवण : कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री मालवण तालुक्यातील कट्टा गुरामनगरी येथील काराणेवाडी निसर्ग निवास या बंगलो प्रकल्पात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला! एक-दोन नव्हे, तर तब्बल आठ बंद बंगल्यांची…

वैभववाडीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला पालकमंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

राष्ट्रभक्ती, शिस्त आणि सेवाभावाचा संदेश; राष्ट्रनिर्माणाचा संकल्प दृढ वैभववाडी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वैभववाडी मंडळाच्या वतीने अर्जुन रावराणे हायस्कूलच्या सभागृहात आयोजित विजयादशमी उत्सवाला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थिती लावली. या उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती, सामाजिक एकात्मता, शिस्त आणि सेवाभावाचा…

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात योगा सेंटर सुरू करण्यासाठी भाजपचा पुढाकार

भाजप नेते विशाल परब यांची घोषणा; प्रशिक्षणार्थी योग शिक्षकांचा प्रमाणपत्र देऊन गौरव पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘फिट इंडिया’ मंत्रातून निरोगी समाजनिर्मितीचा संकल्प सावंतवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट इंडिया’ मंत्रातून प्रेरणा घेत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील १७ जिल्हा परिषद मतदारसंघांसह तिन्ही…

साटेली-भेडशीतील जखमी कंत्राटी वीज कामगाराला न्याय मिळवून देण्यासाठी अशोक सावंत आक्रमक

आर्थिक मदतीसाठी महावितरण प्रशासनाला अल्टिमेटम; अन्यथा सिंधुदुर्ग जिल्हाभर काम बंद आंदोलनाचा इशारा दोडामार्ग : महावितरणच्या कामादरम्यान विजेचा धक्का लागून गंभीर जखमी झालेल्या कंत्राटी कामगार मोहन गावडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी महावितरण कंत्राटी कामगार संघटनेचे नेते अशोक सावंत यांनी आक्रमक भूमिका…

पाच हजारांच्या कथित लाच प्रकरणात ग्राम महसूल अधिकाऱ्याला जामीन; सहा वकिलांनी मांडली बाजू

कुडाळ : सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत अडकलेले पिंगुळी येथील ग्राम महसूल अधिकारी जितेंद्र काळू खेताडे यांना ओरोस येथील विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात एसीबीने २३ ऑक्टोबर २०२६…

error: Content is protected !!