“मालवण प्रीमिअर लीग २०२३” लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत डिसीसी वायरी संघ विजेता

मालवण स्पोर्ट्स क्लबचे आयोजन ; टोपीवाला हायस्कुलच्या बोर्डिंग मैदानावर आठ दिवस रंगला थरार…

मालवण : मालवण स्पोर्ट्स क्लबच्या वतीने टोपीवाला हायस्कुलच्या बोर्डिंग मैदानावर आयोजित मालवण प्रीमियम लीग लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील रोमहर्षक लढतीत डीसीसी वायरी संघाने शर्विन स्पोर्ट्स कुंभारमाठ संघावर दोन गडी राखून विजय मिळवीत विजेतेपद पटकविले. विजेत्या वायरी संघाला ५५ हजार ५५५ रुपये व चषक तर उपविजेत्या कुंभारमाठ संघाला ३३ हजार ३३३ रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले.

मालवण स्पोर्ट्स क्लबतर्फे गेले आठ दिवस बोर्डिंग मैदानावर मालवण प्रीमियर स्पर्धा रंगली. यावर्षी या स्पर्धेचे पाचवे वर्ष होते. या स्पर्धेचा अंतिम सामना डीसीसी वायरी विरुद्ध शर्विन स्पोर्ट्स कुंभारमाठ यांच्यात पार पडला. यामध्ये कुंभारमाठ संघाने प्रथम फलंदाजी करताना मर्यादित २० षटकात सर्वबाद १०० धावा केल्या. यात साईवेद (२०), कुणाल बिरमोळे (२१), बजरंग कुबल (१४) यांनी चांगली खेळी केली. तर वायरी संघाने उत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन करत दर्पण आचरेकर याने ३ तर सुनील मालवणकर याने २ गडी बाद केले. कुंभारमाठ संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना वायरी संघाचीही पडझड झाली. कुंभारमाठ संघाच्या उत्तम गोलंदाजी व क्षेत्ररक्षणामुळे वायरी संघांचे गडी बाद होतं असताना सुनील मालवणकर (२८ धावा) याने एक बाजू लढवत झुंज सुरू ठेवली. हा सामना अखेरच्या षटकात पोहचल्यावर अटीतटीच्या वेळी सिद्धेश लाड (१५) व सौरभ कांबळी (१७) यांनी उत्तम खेळी करून दोन चेंडू शिल्लक ठेवत ८ बाद १०१ धावा करीत वायरी संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात कुंभारमाठ संघाच्या बजरंग कुबल याने २ गडी बाद केले. अंतिम सामन्यात वायरी संघाचा सौरभ कांबळी सामनावीर ठरला.

अंतिम सामन्यापूर्वी सकाळी मालवण स्पोर्ट्स क्लबतर्फे विनर्स स्पोर्ट्स अकॅडमीच्या १७ वर्षाखालील मुलगे व मुली यांच्या संघात प्रदर्शनीय क्रिकेट सामना खेळविण्यात आला. त्यात मुलांच्या संघाने विजय मिळविला. या स्पर्धेतील सामन्यांचे समालोचन शाम वाक्कर, नाना नाईक, प्रदीप देऊलकर, यांनी केले. तर पंच म्हणून उमेश मांजरेकर, दीपक धुरी, मंगेश धुरी, ऍम्बरोज आल्मेडा यांनी काम पाहिले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बॅंकचे संचालक बाबा परब व मेघनाद धुरी, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मालवण स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष सौरभ ताम्हणकर, उपाध्यक्ष गौरव लुडबे, मेघनाद धुरी, फ्रान्सीस फर्नांडिस, सुशील शेडगे, संदीप पेडणेकर, सनी परुळेकर, ज्ञानेश केळूसकर, रुपेश करलकर, राकेश सावंत, सनी परुळेकर, बंड्या पराडकर प्रसाद राणे, पायस आल्मेडा, संदीप पार्टे, वैभव सावंत, विशाल लुडबे, विल्यम परेरा, डॅनिश फर्नाडिस, निशय पालेकर, एजाज मुल्ला, प्रथमेश लुडबे, चिन्मय ढोलम, प्रसाद चव्हाण, श्याम वाककर, राहुल परुळेकर, रोहित चव्हाण, आदी व इतर उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3839

Leave a Reply

error: Content is protected !!