वीर सावरकर गौरव यात्रा उद्या मालवणात ; निलेश राणेंच्या हस्ते होणार पवित्र सागराचे पूजन

शहरातून निघणार भव्य रॅली ; भाजपा – शिवसेनेचे कार्यकर्ते, सावरकर प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने राहणार उपस्थित

मालवण | कुणाल मांजरेकर

भाजपा आणि शिवसेना युती सरकारच्या माध्यमातून राज्यात वीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. कुडाळ – मालवण मतदार संघाच्या वतीने उद्या ( मंगळवारी) ४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता मालवण शहरात ही यात्रा दाखल होत असून भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भरड नाका ते बंदर जेटी पर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. यानंतर श्री. राणेंच्या हस्ते पवित्र सागराचे पूजन केले जाणार असल्याची माहिती भाजपा शिवसेनेच्या वतीने आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. येथील भाजपा कार्यालयात ही पत्रकार परिषद घेण्यात आली.

यावेळी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत, जिल्हा दरम्यान, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक यांनीही मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी व्हावे. असे आवाहन शिवसेनेचे कुडाळ मालवण क्षेत्रप्रमुख बबन शिंदे, तालुकाध्यक्ष राजा गांवकर, शहर प्रमुख बाळू नाटेकर, उपतालुकप्रमुख पराग खोत यांनी केले आहे. अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, भाऊ सामंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, शहर प्रभारी विजय केनवडेकर, दीपक पाटकर, महेश मांजरेकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, विलास मुणगेकर, भाई मांजरेकर, निनाद बादेकर, महेश सारंग, राजू बिडये, महेश वरक, कमलाकांत कोचरेकर, शिवसेना कुडाळ मालवण क्षेत्रप्रमुख बबन शिंदे, तालुकाध्यक्ष राजा गांवकर, शहर प्रमुख बाळू नाटेकर, उपतालुकाप्रमुख पराग खोत यासह अन्य उपस्थित होते.

यावेळी माहिती देताना विजय केनवडेकर म्हणाले, उद्या दुपारी ३ वाजता वीर सावरकर गौरव यात्रा मालवण भरड नाका येथून सुरु होऊन सोमवार पेठ मार्गे मालवण बंदर जेटी येथे पोहोचेल. त्या ठिकाणी निलेश राणे यांच्या हस्ते विधिवत समुद्राचे पूजन होऊन मान्यवर या गौरव यात्रेला संबोधित करतील. त्यानंतर मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण या ठिकाणी विश्व हिंदू परिषद मालवण यांच्या वतीने आयोजित प्रख्यात सिने अभिनेते शरद पोंक्षे यांच्या स्वा. सावरकर जीवन चरित्रावरील व्याख्यानाने गौरव यात्रेची सांगता होणार आहे. आजी-माजी लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, हिंदुत्ववादी समविचारी संघटना तसेच स्वा. सावरकर प्रेमी जनतेने मोठ्या संख्येने या यात्रेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले.

दरम्यान, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक यांनीही मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी व्हावे. असे आवाहन शिवसेनेचे कुडाळ मालवण क्षेत्रप्रमुख बबन शिंदे, तालुकाध्यक्ष राजा गांवकर, शहर प्रमुख बाळू नाटेकर, उपतालुकप्रमुख पराग खोत यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!