सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला यावर्षीचा सर्वोत्कृष्ट कोर बँकिंग सिस्टीम आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त
मालवण : Banking Systems Intelligence या जागतिक पातळीवरच्या बँकिंग क्षेत्रातील काम करणाऱ्या संस्थेमार्फत दिला जाणारा Global Fintech Perspective अंतर्गत बँकींग क्षेत्रात मानाचा समजला जाणारा सर्वोत्कृष्ट कोर बँकिंग सिस्टीम (Implementation) हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण इन्फोसिसचे संचालक बॉबी पारेख यांच्या हस्ते बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांना ताज हॉटेल, मुंबई येथील आयोजित समारंभात प्रदान करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, जिल्हा बँकेच्या संगणक विभागाचे सरव्यवस्थापक नितीन सावंत, व्यवस्थापक रघुनाथ परब हे उपस्थित होते.