खिलाडूवृत्तीने जय पराजय स्वीकारा … !

विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर मालवण पोलिसांचे आवाहन

मालवण : विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर शनिवारी मतमोजणी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी जय पराजय खिलाडू वृत्तीने स्वीकारण्याचे आवाहन मालवण पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी केले आहे.

याबाबत पोलीस ठाण्याच्या वतीने राजकीय पदाधिकारी/कार्यकर्ते यांना करण्यात आलेल्या आवाहनात म्हटले आहे की, उद्या दि. २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. सदर दिवशी आपण शांततेच्या मार्गाने आनंदोत्सव साजरा करण्यात यावा. पराजीत झालेल्या उमेदवार यांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचे घरासमोर फटाके फोडणे, मोठ्या आवाजात स्पीकर लावणे, इत्यादी प्रकार कऱण्यात येऊ नयेत. सध्या आदर्श आचासंहिता तसेच जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी याकरिता संचारबंदी व मनाई आदेश लागू करण्यात आलेले आहेत. निवडणूक अनुषंगाने शासनाने वेळोवेळी जारी कऱण्यात आलेल्या आदेशाचे, मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करून कार्यक्रम शांततेत पार पाडून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे म्हटले आहे

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!