मालवणच्या बोर्डींग मैदानावर उद्यापासून जिल्ह्यातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्पर्धेचा थरार….

“निलेश राणे चषक” क्रिकेट स्पर्धेचे उद्योजक डॉ. दीपक परब यांच्याहस्ते होणार उदघाटन

बाबा परब मित्रमंडळाच्या वतीने २० ते २२ एप्रिल रोजी आयोजन ; विजेत्या संघाला ३ लाख ५० हजाराचे पारितोषिक

मालवण | कुणाल मांजरेकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठ्या बक्षीसांची क्रिकेट स्पर्धा अशी ओळख असलेल्या बाबा परब मित्रमंडळ व मालवण क्रिकेट असोसिएशन आयोजित निलेश राणे चषक डे नाईट टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा २०२३ चा उद्घाटन सोहळा उद्या गुरुवार दि. २० एप्रिल सायंकाळी ४ वाजता टोपीवाला हायस्कुलच्या बोर्डिंग मैदान येथे उद्योजक डॉ. दीपक परब यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती स्पर्धेचे सर्वेसर्वा तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक बाबा परब यांनी दिली आहे.

उद्घाटन सोहळ्यास भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, शहर प्रभारी विजय केनवडेकर, अशोक तोडणकर, दीपक पाटकर, गणेश कुशे, दाजी सावजी, भाजप महिला तालुकाध्यक्षा पूजा करलकर, शहर अध्यक्ष चारुशीला आचरेकर, युवमोर्चा तालुकाध्यक्ष विक्रांत नाईक, शहर अध्यक्ष ललित चव्हाण यांसह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दिग्गज खेळाडूंचा सहभागातून उद्या होणार रंगतदार सामने

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी गुरुवारी शिरसाट स्पोर्ट्स, सागर किनारा दांडी, मन्सूर स्पोर्ट्स, राजाराम वॉरीअर, ध्रुव पार्से गोवा, जागृती डोंबिवली, मुंबई ०९ डोंगरी, संतोष पारकर कासार्डे या दिग्गज खेळाडूंचा भरणा असणारे संघ यांच्यात रंगतदार लढत होणार आहे. सर्व सामने लाईव्ह स्वरूपात असणार आहेत. अशी माहिती बाबा परब यांनी दिली.

२० ते २२ एप्रिल दरम्यान टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड येथे भव्यदिव्य आयोजन करण्यात आलेल्या निलेश राणे चषक स्पर्धेचे हे सहावे वर्ष आहे. यावर्षी स्पर्धेतील विजेत्या संघास ३ लाख ५० हजार व निलेश राणे चषक, उपविजेता संघास १ लाख ७५ हजार व चषक तसेच अन्य पारितोषिक आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!