केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या मार्गदर्शनाखाली मालवणात भाजपचा ग्रामीण कार्यकर्ता मेळावा
ना. राणे यांच्यासह माजी खा. निलेश राणेंची प्रमुख उपस्थिती ; तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची माहिती
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण तालुक्यातील भाजपच्या ग्रामीण विभागातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा शनिवारी २२ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता अथर्व मंगल कार्यालय कुंभारमाठ येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह भाजपचे प्रदेश सचिव, माजी खा. निलेश राणे मार्गदर्शन करणार आहेत.
या मेळाव्यात आगामी बुथ सक्षमीकरण आणि आगामी निवडणुका या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. यासाठी बुथ अध्यक्ष, शक्ति केंद्रप्रमुख, शक्तिकेंद्र प्रभारी, जिल्हापरिषद प्रभारी, आजी माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य विकास संस्था चेअरमन, सहकारातील पदाधिकारी व प्रमुख भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी केले आहे.