Category सिंधुदुर्ग

मालवणात वीजेच्या तारांना स्पर्श होऊन झाड पेटले ; पण सुदैवानेच…

माजी नगरसेवक यतीन खोत यांच्या तत्परतेचे स्थानिकांनी केले कौतुक मालवण | कुणाल मांजरेकर मालवण नगरपालिके समोरील वझे कॉर्नरला झाडाच्या फांदीला मुख्य वीज वाहिनीवरील वीजेच्या तारांचा स्पर्श होऊन आग लागल्याची दुर्घटना सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच…

वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला युवा नेते विशाल परब यांनी ना. नारायण राणेना दिल्या शुभेच्छा

कणकवली : ज्येष्ठ भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विशाल फाउंडेशनचे सर्वेसर्वा तथा भाजपाचे युवा नेते विशाल परब यांनी रविवारी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला ना. राणे यांची कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले.…

केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या संकल्पनेतून १३ एप्रिल रोजी कुडाळमध्ये “उद्योजक संवाद”

विजय केनवडेकर यांची माहिती ; जिल्ह्यातील उद्योजकांना उद्योग वाढीसाठी होणार फायदा मालवण | कुणाल मांजरेकर केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत ना. नारायण राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योजकाना उद्योग वाढीसाठी उद्योग मंत्रालयामार्फत सुक्ष्म आणि लघु उद्योग क्रेडिट गॅरंटी फंड…

मालवण तालुका खरेदी विक्री संघाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

मालवण ख. वि. संघ जिल्ह्यातील अग्रणी संस्था ; नूतन इमारतीच्या माध्यमातून संस्थेच्या नावलौकीकात भर घाला : जयवंत ढोलम मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुका खरेदी विक्री संघाच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा संघाचे संस्थापक कै. नानासाहेब ढोलम यांचे सुपुत्र तथा माजी…

केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा वाढदिवस मालवणात उत्सव म्हणून साजरा होणार

तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची माहिती ; विविध ७१ कामांचा होणार शुभारंभ मालवण : मालवण तालुका भाजपच्या वतीने भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांचा वाढदिवस उत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त उद्या १० एप्रिल रोजी तालुक्यात विविध ७१…

चौके नजिक मारहाणीत कासाराचा मृत्यू ; मृत बोर्डवेचा रहिवाशी

पोलीस तपास सुरु ; काही जण चौकशीसाठी ताब्यात ? मालवण : चौके – कसाल महामार्गावर चौके नजिक शनिवारी सायंकाळी उशिरा झालेल्या झालेल्या मारहाणीत दीपक गेंडे नामक कासाराचा मृत्यू झाल्याची खळबळ जनक घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसानी काहीजणांना ताब्यात घेतल्याचे…

ना. नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग बँकेतर्फे १० एप्रिलला “स्नेहबंध” कार्यक्रम

जिल्हा बँकेची वेबसाईट, कॉन्टॅक्टलेस कार्ड व मायक्रो एटीएमचे ना. राणे यांच्या हस्ते होणार उदघाटन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या ७१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधुन सोमवार दि. १० एप्रिल रोजी सायंकाळी ६…

मालवण खरेदी विक्री संघाच्या नूतन वास्तूचे उद्या निलेश राणेंच्या हस्ते भूमिपूजन

मालवण : मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या सोमवार पेठ येथील नूतन वास्तूचे भूमिपूजन रविवारी ९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती चेअरमन राजन गावकर यांनी दिली. मालवण तालुका सहकारी खरेदी…

ना. राणेंच्या वाढदिवसानिमित्त घुमडे आणि वायरी गर्देरोड येथे १० एप्रिलला लघुरुद्र, महाप्रसाद

भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्यावतीने आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री ना. नारायण राणे यांच्या ७१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्यावतीने घुमडे येथील श्रीदेवी…

गवंडीवाडा येथील “खेळ पैठणीचा” स्पर्धेत सौ. आरती कोडचवाडकर ठरल्या पैठणीच्या मानकरी

श्री राममंदिर मित्रमंडळ व श्री समर्थ रामदास प्रासादिक नाट्यमंडळ यांच्यावतीने आयोजन ; सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाने पुरस्कृत केली होती स्पर्धा मालवण : मालवण गवंडीवाडा येथील श्री राम मंदिरात रामनवमी उत्सवनिमित्त श्री राम मंदिर मित्रमंडळ व श्री समर्थ रामदास प्रासादिक नाट्यमंडळ यांच्यावतीने…

error: Content is protected !!