वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला युवा नेते विशाल परब यांनी ना. नारायण राणेना दिल्या शुभेच्छा
कणकवली : ज्येष्ठ भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विशाल फाउंडेशनचे सर्वेसर्वा तथा भाजपाचे युवा नेते विशाल परब यांनी रविवारी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला ना. राणे यांची कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले. यावेळी सौ. नीलम राणे, आमदार नितेश राणे, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, मोहन सावंत, संदेश सावंत, समीर नलावडे व इतर मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.