मालवण खरेदी विक्री संघाच्या नूतन वास्तूचे उद्या निलेश राणेंच्या हस्ते भूमिपूजन
मालवण : मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या सोमवार पेठ येथील नूतन वास्तूचे भूमिपूजन रविवारी ९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती चेअरमन राजन गावकर यांनी दिली.
मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे सिंधू बझार, भारत गॅस, शेतकऱ्यांसाठी खते, औषधे विक्री करण्यात येते. त्यात आता एका नवीन प्रकल्पाची भर पडत आहे. सागर किनारा नजीक असणाऱ्या या प्रकल्पाच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन रविवारी ९ एप्रिल रोजी माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते होत आहे. यावेळी सर्व सभासद, शेतकरी, ग्राहक, नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन चेअरमन राजन गांवकर यांनी केले आहे.