मालवण तालुका खरेदी विक्री संघाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन
मालवण ख. वि. संघ जिल्ह्यातील अग्रणी संस्था ; नूतन इमारतीच्या माध्यमातून संस्थेच्या नावलौकीकात भर घाला : जयवंत ढोलम
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण तालुका खरेदी विक्री संघाच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा संघाचे संस्थापक कै. नानासाहेब ढोलम यांचे सुपुत्र तथा माजी अध्यक्ष जयवंत ढोलम यांच्या हस्ते संपन्न झाला. कै. नानासाहेबांनी दूरदृष्टी ठेऊन संस्थेसाठी ही जागा खरेदी केली होती. या जागेत आज संस्थेची नवीन इमारत उभी राहणार आहे. मालवण खरेदी- विक्री संघ ही जिल्ह्यातील एक अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाते. संस्थेच्या प्रत्येक संचालक, सदस्याने संस्थेच्या कामकाजावर लक्ष ठेवतानाच आपली जबाबदारी पार पाडावी. कर्मचारी वर्गाने नव्या इमारतीत आणखी चांगला कारभार हाकताना मालवण खरेदी विक्री संघातून ग्राहकांना अधिकाधिक दर्जेदार सेवा द्यावी, असे प्रतिपादन जयवंत ढोलम यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजन गावकर, व्हा.चेअरमन कृष्णा ढोलम, भाजप सहकार आघाडीचे बबलू राऊत, शहर प्रभारी विजय केनवडेकर, दीपक पाटकर, आबा हडकर, परशुराम पाटकर, राजा देसाई, गौरव पाटकर आदी उपस्थित होते.
यावेळी अशोक सावंत, धोंडू चिंदरकर, बाबा परब यांनीही विचार मांडले. प्रास्ताविक करताना खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजन गावकर यांनी संस्थेच्या कामाकाजाचा आढावा घेतला. यावेळी खरेदी विक्री संघांचे संचालक महेश मांजरेकर, विजय ढोलम, प्रफुल्ल प्रभू, अशोक तोडणकर, महेश गावकर, अमित गावडे, सुरेश चौकेकर, राजेंद्र प्रभुदेसाई, अभय प्रभुदेसाई, कृष्णा चव्हाण, अमृता सावंत, पूजा करलकर, पूजा वेरलकर, गणेश कुशे, ललित चव्हाण, भाई मांजरेकर, रवी टेंबुलकर, नारायण लुडबे, हरीश गावकर, महेश सारंग, सुभाष तळवडेकर, अरुण तळगावकर, सुहास हडकर, दिनेश ढोलम, बबन चव्हाण यासह शेतकरी, ग्राहक, विकास सोसायटी चेअरमन, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचे खरेदी विक्री संघाकडून स्वागत करण्यात आले.