ना. नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग बँकेतर्फे १० एप्रिलला “स्नेहबंध” कार्यक्रम
जिल्हा बँकेची वेबसाईट, कॉन्टॅक्टलेस कार्ड व मायक्रो एटीएमचे ना. राणे यांच्या हस्ते होणार उदघाटन
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी)
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या ७१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधुन सोमवार दि. १० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता आराध्या हॉटेल, झाराप झिरो पॉईन्ट, नेमळे ब्रिज जवळ, मुंबई गोवा महामार्ग, कुडाळ येथे ‘स्नेहबंध’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची वेबसाईट, कॉन्टॅक्टलेस कार्ड व मायक्रो ए.टी.एम चा उदघाटन सोहळा तसेच बँकेच्या आर्थिक वर्षात उल्लेखनीय काम केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव ना. नारायण राणे यांच्याहस्ते होणार आहे.
या कार्यक्रमास गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री आनंदराव अडसुळ, गोवा बागायतदार संघ अध्यक्ष नरेंद्र सावईकर, सौ. नीलमताई राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्यासह जिल्हा बँकेचे सर्व संचालक व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या ‘स्नेहबंध’ सोहळा कार्यक्रमास सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी केले आहे.