केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या संकल्पनेतून १३ एप्रिल रोजी कुडाळमध्ये “उद्योजक संवाद”

विजय केनवडेकर यांची माहिती ; जिल्ह्यातील उद्योजकांना उद्योग वाढीसाठी होणार फायदा

मालवण | कुणाल मांजरेकर

केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत ना. नारायण राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योजकाना उद्योग वाढीसाठी उद्योग मंत्रालयामार्फत सुक्ष्म आणि लघु उद्योग क्रेडिट गॅरंटी फंड (CGTMSE) मार्फत एक कोटी वरील उलाढालीतील व्यवसाय उत्पादक यांच्यासाठी गुरुवार दि. १३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता कुडाळ एमआयडीसी विश्रामगृह येथे कुडाळ एमआयडीसी उद्योग संघटना, सिंधुदूर्ग व्यापारी संघ, पर्यटन महासंघ यांच्या सहभागाने उद्योजक संवाद आयोजित केला आहे.

या कार्यकमात योजनेची माहिती व फायदा व क्रेडिट गॅरंटी फंडचे उद्योजकांचे कर्ज पुरवठा प्रकरण करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या कार्यक्रमाला सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयांचे एजीएम धिरज कुमार, के. शहाजी, रिशब जैन, संगिता पुजारी तसेच राष्ट्रीयकृत बॅकेचे महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी तसेच खाजगी बॅकेचे प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योजकांनी या संधीचा फायदा घ्यावा. अधिक माहितीसाठी ९४२०२०६८७३ नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन भाजपा उद्योग व्यापार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3530

Leave a Reply

error: Content is protected !!