मालवणात वीजेच्या तारांना स्पर्श होऊन झाड पेटले ; पण सुदैवानेच…

माजी नगरसेवक यतीन खोत यांच्या तत्परतेचे स्थानिकांनी केले कौतुक

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण नगरपालिके समोरील वझे कॉर्नरला झाडाच्या फांदीला मुख्य वीज वाहिनीवरील वीजेच्या तारांचा स्पर्श होऊन आग लागल्याची दुर्घटना सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक यतीन खोत यांनी तातडीने वीज वितरणचे कर्मचारी आणि नगरपालिकेचा अग्निशमन बंब येथे पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळवले. यामुळे मोठी दुर्घटना टळली.

सोमवारी सकाळी सदरील झाडाला आग लागल्याची माहिती मिळताच माजी नगरसेवक यतीन खोत यांनी नगरपालिकेला माहिती दिली. यावेळी स्वच्छता मुकादम आनंद वळंजू, वैभव वळंजू, सागर जाधव, नितीन शिर्सेकर, सुनील गरगटे आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांनी अग्निशमन बंबाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले. तर महावितरणचे कर्मचारी गणेश देऊलकर, सिद्धेश गावडे यांनी तात्काळ वीज पुरवठा खंडित केला. काही वेळातच हा वीज पुरवठा पूर्ववत सुरु करण्यात आला. या कामी पुढाकार घेणाऱ्या माजी नगरसेवक यतीन खोत यांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!