Category बातम्या

कुडाळमध्ये लाचखोर तलाठ्याला एसीबीचा दणका

सातबारा नोंदीसाठी ५ हजारांची लाच; रेल्वे ब्रिजजवळ रंगेहाथ पकडले; महसूल विभागात खळबळ! कुडाळ : सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठीही पैशांची मागणी? कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जोरदार दणका दिला आहे. सातबारा उताऱ्यावर नोंद करून देण्यासाठी ५ हजार रुपयांची…

सिंधुदुर्गात २२ नोव्हेंबरला भव्य कायदेविषयक सेवा महाशिबिर

कसाल येथे आयोजन; शासकीय योजनांचा लाभ, मोफत कायदेविषयक सल्ला आणि आरोग्य तपासणीची सुविधा एकाच छताखाली सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील वंचित, दुर्बल आणि गरजू नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच कायदेविषयक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी रविवार, २२ नोव्हेंबर रोजी कसाल…

चोरांच्या उलट्या बोंबा बंद करा ; आधी अवैध पर्ससीनधारकांवर हातोडा चालवा

पारंपरिक मच्छीमारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यापूर्वी पर्ससीन ट्रॉलरचे परवाने तपासा – बाबी जोगी मासळी लुटीच्या कथित व्हिडिओची सखोल चौकशी करा ; ड्रोनद्वारे समुद्रावर नजर ठेवून बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मालवण : समुद्रात नियम धाब्यावर बसवून मासेमारी करायची,…

सिंधुदुर्गातील पारंपरिक मच्छीमारांचा एल्गार! समुद्रावरील हक्कांसह विनाशकारी मासेमारीवर निर्बंधांची मागणी

राष्ट्रीय कृती आराखड्यासाठी चिवला येथे पहिली सल्लामसलत; मच्छीमारांच्या उपजीविका, महिलांचे प्रश्न आणि हवामान संकटावर सविस्तर चर्चा मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपरिक आणि लघुस्तरीय मच्छीमारांनी आपल्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि शाश्वत मासेमारीसाठी ठोस मागण्या मांडल्या आहेत. समुद्रातील मत्स्यसंपत्तीवर पारंपरिक मच्छीमारांचा प्रथम हक्क,…

दुष्काळग्रस्त मच्छीमारांना शासनाकडून मदतीचा दिलासा

नुकसानीची आकडेवारी मिळताच मदत देणार; मंत्री नितेश राणेंचा विश्वास बीडच्या गेवराई तालुक्यातील गोविंदवाडी तलावाची पाहणीमत्स्यबीज, गाळ उपसा आणि KCC प्रश्नांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश बीड : कमी पर्जन्यमानामुळे दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करणाऱ्या मच्छीमारांना शासनाकडून आवश्यक ती मदत मिळवून देणार, अशी ग्वाही…

देवगड-वेंगुर्ला सागरी हद्दीत मासळी चोरीचा गंभीर आरोप; ट्रॉलर मच्छीमार आक्रमक

चार-पाच छोट्या नौकांकडून ट्रॉलरला घेराव घालून मासळी लुटल्याचा दावा; १३ संशयितांसह मालवणमधील पाच खरेदीदारांची नावे पोलिसांना दिली देवगड : समुद्रात कष्टाने मासेमारी करायची आणि त्याच मासळीवर दुसऱ्यांनी डल्ला मारायचा! देवगड ते वेंगुर्ला सागरी हद्दीत ट्रॉलर नौकांमधील मासळी चोरी होत असल्याचा…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा विविध योजनांचा आढावा; रोजगारनिर्मिती आणि जलसंधारणावर भर

‘एकही पात्र मतदार मतदार यादीबाहेर नको’; रोहयोतून अधिकाधिक कामे हाती घेण्याचे निर्देश सिंधुदुर्ग : मतदार यादीत प्रत्येक पात्र नागरिकाचा समावेश व्हावा, ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी वाढाव्यात आणि संभाव्य पाणीटंचाईवर वेळीच उपाययोजना करता याव्यात, यासाठी जिल्हा प्रशासनाने हालचाली वेगवान केल्या आहेत.…

चराठा टेंबवाडीत २४ वर्षीय तरुणाची आत्महत्या; परिसरात हळहळ

खिशात सापडली चिठ्ठी; पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद सावंतवाडी : चराठा टेंबवाडी येथील परेश उमेश तांबोसकर (वय २४) या तरुणाने राहत्या घरातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. परेश हा…

मालवणच्या दांडी आवारवाडीत वीज समस्येवर उपाय; स्थानिक नगरसेविका सौ. अन्वेशा आचरेकर यांचा पुढाकार

विद्युत वाहिन्यांवरील झाडी हटवली; वारंवार होणाऱ्या वीजपुरवठ्यातील चढ-उतारातून नागरिकांना दिलासा मालवण | कुणाल मांजरेकर शहरातील दांडी आवारवाडी परिसरात विद्युत वाहिन्यांवर मोठ्या प्रमाणात झाडी वाढल्याने वीजपुरवठ्यात वारंवार चढ-उतार होत होते. यामुळे स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. या समस्येची…

पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धेत गौरेश कांबळी प्रथम

समीर वायंगणकर द्वितीय, भूषण मेतर तृतीय; मालवण नगरपरिषदेत विजेत्यांचा गौरव मालवण : मालवण नगरपरिषदेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत आयोजित ‘पर्यावरणपूरक गणेश चतुर्थी सजावट स्पर्धा २०२६’ चा बक्षीस वितरण समारंभ गुरुवारी नगरपरिषदेच्या सभागृहात उत्साहात पार पडला. या स्पर्धेत…

५०० कोटींच्या आरोपावरून आ. निलेश राणेंचा मनोज जरांगेंवर घणाघात

“कोणाकडून तरी ऐकलं म्हणजे पुरावा झाला का? माणुसकी आणि लाज तरी बाळगा!” सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर महाराष्ट्राच्या राजकारणात ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहारावरून सुरू झालेल्या वादात आता आमदार निलेश राणे यांनी उडी घेत मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला…

मालवणमध्ये अनधिकृत वाळू वाहतुकीला दणका

महसूल-पोलिसांची धडक; तीन डंपर जप्त : प्रत्येक डंपरला १.२५ लाखांपर्यंत दंडाची शक्यता मालवण : मालवणमध्ये रात्रीच्या अंधारात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर महसूल आणि पोलीस प्रशासनाने जोरदार प्रहार केला. देऊळवाडा नाका येथे मंगळवारी रात्री उशिरा संयुक्त कारवाई करत वाळू वाहतूक…

error: Content is protected !!