महान प्रीमिअर लीगचे सौरभ ताम्हणकर यांच्या हस्ते उदघाटन

ना. नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

मालवण : भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त महान येथील भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महान प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी सभापती सुधीर साळसकर, सरपंच अक्षय तावडे, मदन घाडी, माजी सरपंच सुभाष साळुंके, मंगेश साळसकर, नीलकंठ घाडी यांच्यासह निशय पालेकर, फ्रान्सिस फर्नांडीस तसेच अन्य ग्रामस्थ आणि भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. या स्पर्धेत गांगेश्वर महान, भवानी फायटर, सेजल स्पोर्ट्स, किंगस्टार मसुरे, मालवण प्रीमिअर लीग आदी संघ सहभागी झाले आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!