यंगस्टार मित्रमंडळाच्या कबड्डी स्पर्धेला युवा नेते विशाल परब यांची भेट ; आयोजनाचे कौतुक

भविष्यात याही पेक्षा अधिक भव्य दिव्य आयोजन करा, विशाल सेवा फाउंडेशनतर्फे सर्वतोपरी मदत : विशाल परब यांची ग्वाही

कणकवली : भाजपाचे युवा नेते, उद्योजक तथा विशालसेवा फाउंडेशनचे संस्थापक विशाल परब यांनी कणकवली यंगस्टार मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेला भेट दिली. यावेळी स्पर्धेच्या आयोजनाचे कौतुक करतानाच भविष्यात यंगस्टार मित्रमंडळाच्या वतीने यापेक्षाही मॅटवर भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करा. विशाल सेवा फाऊंडेशनच्या वतीने सर्वातोपरी मदत करण्याची ग्वाही श्री. परब यांनी दिली.

गेली २७ वर्षे मंडळाच्या वतीने होणारे कार्यक्रम आपण जाणून आहोत. त्यावेळी मीडिया एवढी विस्तारलेली नव्हती. पण वृत्तपत्राच्या माध्यमातून मी वाचत आलो होतो. विद्यार्थी दशेमध्ये बघितलेले हे मंडळाचे काम प्रत्यक्षात या व्यासपीठावरून बघता आलं. याचा आनंद होत आहे, असे विशाल परब यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे, अण्णा कोदे यांच्यासह यंगस्टार मित्रमंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशाल परब यांच्या हस्ते उपांत्य फेरीतील सामन्याची नाणेफेक करण्यात आली. हजारो लोकांच्या उपस्थितीत झालेल्या स्पर्धेला प्रमुख अतिथी म्हणून विशाल परब यांची उपस्थिती होती. यावेळी यंगस्टार मंडळाच्या वतीने विशाल परब यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3599

Leave a Reply

error: Content is protected !!