महेंद्र चव्हाण, राजू परुळेकर यांची शब्दपूर्ती ; गोठणेतील रस्ता डांबरीकरणाला अखेर मुहूर्त !
ग्रामपंचायत निवडणुकीत दिला होता शब्द ; गावातील अन्य विकास कामे भाजपच्या माध्यमातून पूर्ण करण्याची ग्वाही
मालवण | कुणाल मांजरेकर
जि. प. चे माजी वित्त आणि बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण आणि माजी पं. स. उपसभापती राजू परुळेकर यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामस्थांना दिलेल्या शब्दानुसार गोठणे यशवंतवाडी येथील रस्त्याच्या डांबरीकरणाला रस्ते दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत १० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचा शुभारंभ नवनिर्वाचित सरपंच सौ. दीप्ती दयाळ हाटले यांच्या हस्ते करण्यात आला.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या दरम्यान माजी बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण आणि माजी उपसभापती राजू परुळेकर यांनी यशवंतवाडी ग्रामस्थांना रस्त्या संदर्भात शब्द दिला होता. त्याप्रमाणे रविवारी गोठणे गावच्या नवनिर्वाचित सरपंच सौ. दीप्ती दयाळ हाटले यांच्याहस्ते यशवंतवाडी रस्ता डांबरीकरण शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी किर्लोस गावचे सुपुत्र भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते अर्जुन उर्फ बाळा लाड, गोठणे गावचे उपसरपंच बाबू परब, ग्रा. पं. सदस्य सोनाली पालांडे, अर्चना मुणगेकर, माजी उपसरपंच राजेंद्र लाड, मकरंद राणे, मिहीर राणे, संतोष धुरी, दयाळ हाटले, योगेश बाईत, घनश्याम चव्हाण, भास्कर वायंगणकर, महेश चिंदरकर, समीर पालांडे, तुषार लाड, शैलेश लाड, बाळू कुवरे, दत्तू वायंगणकर जठार, ज्येष्ठ नागरिक मधुकर हाटले, प्रकाश हाटले तसेच भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. गोठणे गावातील इतर रस्ते आणि विकास कामे केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणे, भाजपा नेते दत्ता सामंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, गणेश सुर्वे यांच्या पाठपुराव्याने रस्ते आणि इतरही कामे टप्प्याटप्प्याने करण्याची ग्वाही श्री. चव्हाण, श्री. परुळेकर यांनी दिली आहे.