मालवण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटात टोपीवाला हायस्कुल प्रथम
माध्यमिक गटात महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय चौके प्रशाला प्रथम
मालवण : मालवण पंचायत समिती आणि ज्ञानदीप विद्यालय वायंगणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सुवर्ण महोत्सवी मालवण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटातून टोपीवाला हायस्कूल तर माध्यमिक गटातून महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय चौके प्रशालेने विज्ञान उपकरणे प्रतिकृती प्रकारात प्रथम क्रमांक पटकाविला.
मालवण तालुक्यातील वायंगणी येथील ज्ञानदीप विद्यालय येथे दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शन पार पडले. विद्यान प्रदर्शनाच्या सांगता समारोपावेळी स्पर्धांमध्ये यश प्राप्त करणाऱ्या प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी संजय माने, शिक्षण विस्तार अधिकारी उदय दिक्षीत, आचरा केंद्रप्रमुख सुगंधा गुरव, संस्था सचिव वैभव जोशी, मुख्याध्यापक दगडू टकले, तोंडवळी प्रशालेचे शिक्षक राजेश भिरंवडेकर आदी मान्यवर आणि तालुक्यातील प्रशालांचे शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रभुदास आजगावकर तर आभार संजय जाधव यांनी मानले. विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक १९ तर माध्यमिक १५ प्रशालांनी सहभाग दर्शवला.
स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे : प्रतिकृती (प्राथमिक) – प्रथम – कस्तुरी तलवारे (टोपीवाला हायस्कूल), द्वितीय – निखिल भावे (शिरवंडे हायस्कूल), तृतीय – अद्वैत अवसरे (भंडारी हायस्कूल), माध्यमिक गट – प्रथम – केदार डिचोलकर (चौके हायस्कूल), द्वितीय – ग्रीष्मा धुरी (पोईप हायस्कूल), तेजस अवसरे (वराड हायस्कूल). शिक्षक प्रतिकृती (प्राथमिक) – प्रथम -देविदास प्रभुगावकर (हडी नं. १), द्वितीय – विनीत देशपांडे (नांदरुख), तृतीय – सुप्रिया मेस्त्री (ओवळीये नं. १). माध्यमिक गट – प्रथम – प्रकाश कानूरकर (वराडकर हायस्कुल कट्टा), द्वितीय – विष्णू काणेकर (शिरवंडे हायस्कूल), तृतीय – छाया कुणकवळेकर (वायंगणी हायस्कूल). प्रयोगशाळा परिचर – प्रथम – विजय लिंगायत (रामगड हायस्कूल), द्वितीय – संदीप धामापूरकर (काळसे हायस्कूल).
निबंध स्पर्धा (प्राथमिक गट) – प्रथम -निरजा परब (श्रावण नं. १) , द्वितीय – वेदिका परब (पोईप हायस्कूल), तृतीय – रुद्र जाधव (आचरा हायस्कूल), माध्यमिक गट – प्रथम – वेदिका परब (पोईप हायस्कूल), द्वितीय – वैष्णवी जिकमडे (रामगड हायस्कूल), तृतीय – भक्ती सावंत (वायंगणी हायस्कूल). प्रश्नमंजुषा (प्राथमिक गट) – प्रथम – वायंगणी हायस्कूल, द्वितीय – टोपीवाला हायस्कूल, तृतीय – मसुरे शाळा नं. १, माध्यमिक गट – प्रथम – वायंगणी हायस्कूल, द्वितीय – वराडकर हायस्कूल कट्टा, तृतीय – आचरा हायस्कूल. वक्तृत्व स्पर्धा (प्राथमिक गट) – प्रथम – रोशन साळुंखे (टोपीवाला हायस्कूल), द्वितीय – दिया गोलतकर (वरची तोंडवळी), तृतीय – कृतिका लोहार (वराडकर हायस्कूल कट्टा), माध्यमिक गट – प्रथम – खुशी परब (पोईप हायस्कूल), द्वितीय – सम्राट राजे (भंडारी हायस्कूल), तृतीय – शुभ्रा प्रभुगावकर (रोझरी इंग्लिश स्कुल).