देवली वाळू प्रकरणात “हे” डंपर सील ; मालकांना नोटीसा बजावण्याची कार्यवाही सुरू

आरटीओ कडूनही सर्व डंपरची तपासणी ; मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांची माहिती

मालवण : देवली सडा येथे अनधिकृत वाळू साठा ठिकाणी सापडून आलेल्या २८ डंपर पैकी २६ डंपर आहे त्याच ठिकाणी सील करून ठेवण्यात आले आहेत. डंपर ड्रायव्हर पळून गेले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व डंपर मालकांना व अनधिकृत वाळू साठा सापडला त्या जमीन मालकांना नोटिसा बजावण्याची कार्यवाही महसूल प्रशासना मार्फत सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांनी शनिवारी दिली.

दरम्यान वाळूने भरलेले दोन डंपर मालवण तहसिलदार कार्यालय येथे आणण्यात आले आहेत. त्या डंपर मालकांना दंडात्मक कारवाई तसेच खुलासा बाबत नोटिसा बजावण्याची कारवाई करण्यात आली आहे. एका डंपर मालकाला नोटीस प्राप्त झाली आहे. अशी माहितीही तहसीलदार यांनी दिली आहे.

देवली सडा येथे सील केलेले डंपर

सागरी महामार्ग देवली सडा पासून आतील कातळ भाग कच्च्या रस्त्यावर अनधिकृत वाळू साठा बाजूला जे डंपर सापडून आले ते त्याच ठिकाणी सील करण्यात आले. आरटीओ अधिकारी यांच्या मार्फतही डंपर तपासणी करण्यात आली. त्या नुसारही नियमांचे उल्लंघन असलेल्या डंपरवर कारवाई होणार आहे. डंपर सील केले त्यात एमएच ०७ सी ६१७९, केए ६२ बी ९८१०, एमएच ०७ एक्स ००९७, एमएच ०७ पी ५०९९, एमएच ४६ एफ ७६८६, एमएच ०७ सी ६३०५, जीए ०९ यु ३३२२, एमएच ०७ सी ५३४९, जीए ०५ टी २५६७, एमएच ०७ एक्स ०३०३, जीए ०९ यु २७७१, एमएच ०७ एजे २६६९, एमएच ०७ सी ५६४७, एमएच ०७ एजे २०१५, जीए ०५ टी ६४५३, जीए ०९ यु ३२०६, एमएच ०७ एक्स १७९९, जीए ०३ एएच ५४०६, जीए ११ टी ३९०९, एमएच ४६ एफ ६१४६, जीए ०५ टी २१४५, एमएच ०७ सी ५९६६, एमएच ०४ इवाय ७९८४, केए २१ सी ३५५२, जीए ०९ यु २५१०, एमएच ०७ सी ५८९७ या २६ डंपर मालकांना नोटिसा बजावण्याची कार्यवाही सुरू असल्याचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी सांगितले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!