गोठणे बिडवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरणासाठी भाजपा नेते निलेश राणे यांना निवेदन

माजी उपसभापती राजू परुळेकर व ग्रामस्थांचा पुढाकार

मालवण : गोठणे आचरा मुख्य रस्ता ते यशवंत वाडी मार्गे बिडवाडी जाणारा रस्ता तसेच गोठणे गावठण घाडीवाडी ते सडेवाडी जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण करण्याच्या मागणीसाठी माजी उपसभापती राजू परुळेकर आणि गोठणे गावातील ग्रामस्थांनी भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांना निवेदन सादर केले. यावेळी दयाळ हाटले, गोठणे उपसरपंच बाळा परब आदिंसह जिल्हा बँक संचालक बाबा परब, मालवण तालुका खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गावंकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!