मालवण बाजारपेठेत उद्यापासून सकाळी ९ पर्यंतच एसटी धावणार !
पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय : आगारप्रमुखांची माहिती
मालवण | कुणाल मांजरेकर
नाताळ आणि थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर मालवणात पर्यटकांची गर्दी झाली आहे. त्यामुळे बाजारपेठेतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उद्या (सोमवार) पासून सकाळी ९ वाजेपर्यंतच बाजारपेठेतून एसटी वाहतूक सुरु आहेत. यानंतर मात्र एसटी फेऱ्या बाजारात जाणार नाहीत. २ जानेवारी नंतर एसटी वाहतूक पूर्ववत होणार आहे. प्रवाशांनी यांची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन आगारप्रमुख सचेतन बोवलेकर यांनी दिली आहे
मालवणात सध्या पर्यटकांची गर्दी असून बाजारपेठेत वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे येथून एसटी मार्गस्थ करणे चालकांना अशक्य होत असून येथे लहान मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पर्यटन हंगाम संपेपर्यंत बाजारातून सकाळी ९ वाजेपर्यतच एसटी सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सकाळी ९ नंतर आचरा, हडी, सर्जेकोट, कांदळगाव सह या मार्गांवरील एसटी बसेस सागरी महामार्गांवरून मार्गस्थ होतील, २ जानेवारी पासून एसटी वाहतूक बाजारातून पूर्ववत सुरु होईल, अशी माहिती आगार प्रमुख सचेतन बोवलेकर यांनी दिली आहे.