रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई आयोजित रंगभरण स्पर्धेत निधी दिपक पेडणेकरला सुवर्णपदक !
राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड ; निधी पेडणेकर मसुरे अंगणवाडीची बाल विद्यार्थिनी
मसुरे : रंगोत्सव सेलिब्रेशन ही राष्ट्रीय स्तरावरील हस्ताक्षर, रंगभरण, टॅटू मेकिंग, कार्टून मेकिंग अशी कला स्पर्धा मुलुंड मुंबईच्या रंगोत्सव संस्थेमार्फत आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये अंगणवाडी मसुरे गडघेराची विद्यार्थिनी निधी दीपक पेडणेकर हिने रंगभरण स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. तिची पुढील राष्ट्रीय स्तरासाठी निवड करण्यात आली.
निधी पेडणेकर हिला सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. निधी हिला विनोद कदम, अंगणवाडी शिक्षिका श्रीम. नंदा सावंत मॅडम, अंगणवाडी सहाय्यक बागवे मॅडम,केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका सौभाग्यवती शर्वरी सावंत, गुरुनाथ ताम्हणकर, श्रीमती मगर मॅडम, श्रीयुत गावडे सर, उमेश खराबी सर, विनोद सातार्डेकर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आणि शाळेतील सर्व शिक्षक यांनी मार्गदर्शन केले. तिच्या या यशाबद्दल उपमुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग राजेंद्र पराडकर, उद्योजक डॉ. दीपक परब, अखिल भारतीय कॅरम फेडरेशनचे उपाध्यक्ष बाळासाहेब गोसावी, उद्योजक दीपक सावंत, समाजसेवक नंदू परब, मर्डे सरपंच संदीप हडकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, सौ. सरोज परब, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, गायत्री ठाकूर, महेश बागवे, विलास मेस्त्री, उपसरपंच पिंट्या गावकर, माजी उपसरपंच अशोक बागवे यांनी अभिनंदन केले आहे. निधी हिला आई ज्योती पेडणेकर, वडील दीपक पेडणेकर,वैभवी पेडणेकर, रेश्मा झुंजार पेडणेकर यांचे मार्गदर्शन लाभले.