सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाच्या तुळस सजावट स्पर्धेत तन्वी राऊत ठरल्या विजेतेपदाच्या मानकरी

अर्चना देसाई उपविजेत्या तर माधवी तिरोडकर यांना विशेष पारितोषिक

गवंडीवाडा राम मंदिरात पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

मालवण | कुणाल मांजरेकर

येथील सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने तुलसी विवाहा निमित्ताने घेण्यात आलेल्या आगळ्या वेगळ्या तुळस सजावट स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा बुधवारी रात्री गवंडीवाडा येथील राम मंदिरात संपन्न झाला. या स्पर्धेत तन्वी राऊत विजेतेपदाच्या मानकरी ठरल्या असून अर्चना संतोष देसाई यांना उपविजेते पदाचा बहुमान मिळाला आहे. पारितोषिक वितरण सोहळ्या ठिकाणी घेण्यात आलेल्या ऑन दी स्पॉट प्रश्नमंजुषा स्पर्धेत माधवी तिरोडकर यांनी विशेष पारितोषिक पटकावले आहे.

स्पर्धेतील विजेत्या तन्वी राऊत हीची तुळस आणि सजावट

सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाने यावर्षी प्रथमच तुलसी विवाहाचे औचित्य साधून महिलांसाठी तुळस सजावट ही अभिनव स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत तब्बल ४५ जणांनी सहभाग घेतला. या स्पर्धेच्या निमित्ताने स्पर्धकांनी आकर्षकरित्या तुळसी सजवल्या होत्या. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ बुधवारी रात्री गवंडीवाडा येथील राम मंदिरात भरड दत्त मंदिराचे पुजारी बाळू काजरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी सर्व सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धेतील विजेत्या तन्वी राऊत यांना मिक्सर ग्राईंडर तर उपविजेत्या अर्चना देसाई यांना इंडक्शन कुकटॉप देण्यात आला. या स्पर्धे दरम्यान ऑन दी स्पॉट प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये उपस्थित महिलांना तुळशी बाबत प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये माधवी तिरोडकर विजेत्या ठरल्या. त्याना आकर्षक पारितोषिक देण्यात आले.

उपविजेत्या अर्चना देसाई यांची तुळस व सजावट

यावेळी सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांच्यासह संध्या राजन परुळेकर, चित्रा चेतन हरमलकर, भाऊ मोर्जे, दाजी मोर्जे, केतन कोचरेकर, तन्मय पराडकर, दिवाकर जाधव, अरुण जाधव, अजय मोर्जे, दीपक कापडोसकर, कैलास रेडकर, प्रशांत गवंडी, महेश यमकर, अविनाश चोडणेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. विनोद सातार्डेकर यांनी ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन केले.

ऑन दी स्पॉट प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्या माधवी तिरोडकर यांना पारितोषिक देताना बाळू काजरेकर

संस्कृतीची जोपासना करण्यासाठी विविधांगी कार्यक्रम : सौरभ ताम्हणकर

आयोजक सौरभ ताम्हणकर यांनी मंडळाच्या वतीने यापुढील काळात देखील असे विविध उपक्रम घेण्यात येतील, असे जाहीर केले. या स्पर्धेच्या निमित्ताने महिलांनी आकर्षकरित्या आपल्या अंगणातील तुळशी सजवल्या. आपल्या संस्कृतीची जोपासना करण्यासाठी हा कार्यक्रम आपण घेतला होता. आणि स्पर्धकांचा उत्साह पाहता हा उद्देश सफल झाला आहे, असे ते म्हणाले. यावेळी बाळू काजरेकर यांनी तुळशीचे धार्मिक महत्व विषद केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!