“कोकण मिरर” च्या आरती संग्रहाचे सुरेश प्रभूंच्या हस्ते प्रकाशन

मालवण : कोकण मिरर डिजिटल न्यूज चॅनेलच्या वतीने गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रसिध्द करण्यात आलेल्या आरती संग्रहाचे माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते मंगळवारी प्रकाशन करण्यात आले.

कोकण मिररच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी हा आरती संग्रह प्रकाशित करण्यात आला आहे. यावेळी सौ. उमा प्रभू, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, जिल्हा सरचिटणीस नितीन वाळके, भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, विजय केनवडेकर, विलास हडकर, राजन नाईक, नारायण कुबल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3602

Leave a Reply

error: Content is protected !!