मठबुद्रुक विकास सोसायटीच्या चेअरमनपदी राजू परुळेकर बिनविरोध
सहकाराच्या माध्यमातून गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध ; परुळेकर यांची ग्वाही
मालवण : मठबुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी सतीश उर्फ राजू परुळेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन सहकाराच्या माध्यमातून गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध राहू अशी ग्वाही श्री. परुळेकर यांनी यावेळी दिली.
मठबुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी अजय हिर्लेकर यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अनंत राऊत, जनार्दन सावंत, बाळा येरम, मोहन वेंगुर्लेकर, गुरुदेव केळुसकर, बाबा घाडी, गुणाजी बागवे, भानुदास गायकवाड, उमाजी मालप, सोनू जंगले, अशोक कांदळकर, श्री. पाताडे, निकिता चव्हाण, सचिव श्री. कदम, श्रीमती कांदळकर, अन्य संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते.