भर पावसातही महिलांचा उत्साह कायम ; महिलांच्या नारळ लढवण्याच्या स्पर्धेत अक्षता रोहन आचरेकर ठरल्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी

मालवणी संस्कृती व वारसा मंडळाच्या वतीने आयोजित स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; ५०० महिला स्पर्धक सहभागी

खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक, माजी आ. हुस्नबानू खलीपे यांच्यासह सर्वपक्षीय मान्यवरांची उपस्थिती

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवणी संस्कृती व वारसा मंडळ, मालवणच्यावतीने येथील बंदर जेटीवर घेण्यात आलेल्या महिलांसाठी नारळ लढवणे स्पर्धेत अक्षता रोहन आचरेकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला. त्यांना पैठणी, सोन्याची नथ व दहा लाखाचा विमा हे पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भर पावसातही ५०० महिलांनी स्पर्धेत सहभागी होत स्पर्धेचा आनंद लुटला. स्पर्धेचे उदघाटन करवीर कोल्हापूरच्या माजी उपसभापती अरुणीमा माने यांच्या हस्ते झाले. शिवसेना खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, काँग्रेसच्या माजी आमदार हुस्नबानू खलीपे यांच्यासह सर्वपक्षीय मान्यवरांनी स्पर्धेला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून मालवणी संस्कृती व वारसा मंडळ, मालवणच्यावतीने आयोजित महिलांच्या नारळ लढवण्याच्या स्पर्धेचे यंदा सातवे वर्ष आहे. या स्पर्धेतील विजेत्या चार महिलांना प्रत्येकी पैठणी, सोन्याची नथ, चांदीच्या पैंजनी, मोबाईल व दहा लाखाचा विमा बक्षीस देण्यात आले. यात अनुक्रमे प्रथम क्रमांक अक्षता रोहन आचरेकर यांनी मिळवला. त्यांना पैठणी, सोन्याची नथ व दहा लाखांचा विमा देण्यात आला. तर द्वितीय क्रमांक निकिता अजित माळगावकर यांना पैठणी, सोन्याची नथ व दहा लाखाचा विमा, तृतीय क्रमांक स्वरा संतोष हळदणकर यांना पैठणी, चांदीची पैंजण व दहा लाखाचा विमा आणि चतुर्थ क्रमांक विमल सत्यवान व वेंगुर्लेकर यांना पैठणी मोबाईल व दहा लाखाचा विमा पारितोषिक देण्यात आले. त्याच प्रमाणे उपस्थिती मधून लकी ड्रॉ विजेता सौ. मंदा जोशी यांना चांदीचा कंबरपट्टा बक्षीस देण्यात आले.

विजेत्यांना माजी आमदार हुस्नबानू खलीपे, मंडळाच्या सल्लागार ऍड. अमृता अरविंद मोंडकर, उपाध्यक्षा- सौ. नीलम करंगूटकर, कुडाळ नगराध्यक्षा आफ्रिन करोल व समाजसेविका विद्या फर्नांडिस यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. यंदा या स्पर्धेत ५०० महिलांनी सहभाग घेतला. गेली ६ वर्ष या स्पर्धेचे आयोजन होत असून यंदाचे ७ वे वर्ष असून खास करून महिलांच्या स्पर्धेसाठी तळकोकणातील नावाजलेला एकमेव आगळा वेगळा कार्यक्रमही पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येत महिलांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढविली. या बद्दल मालवणी संस्कृती व वारसा मंडळाच्या वतीने अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमा दरम्यान मुलगी शिकली प्रगती झाली, झाडे लावा झाडे वाचवा, प्लास्टिक वापर टाळा असा सामाजिक संदेश देखील देण्यात आला.

या कार्यक्रमास खासदार विनायक राऊत, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब,जिल्हा नियोजन समिती सदस्य हरी खोबरेकर, बाबी जोगी, मंदार केणी, महेंद्र म्हाडगुत, अनंत पाटकर, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसच्या माजी आमदार हुस्नबानू खलीपे, (रत्नागिरी), आफ्रिन करोल (कुडाळ नगराध्यक्षा), अरुणीमा माने करवीर पंचायत समिती सदस्य,(कोल्हापूर) जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शादभाई शेख, जमीर खलीपे, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, बाळु अंधारी, आमिदि मेस्त्री, पल्लवी तारी, सुंदरवल्ली स्वामी, स्मिता वागले, जसमीन लकमेश्वर, अमृत राऊळ, जिल्हा बँक संचालक मेघनाद धुरी, हेमंत माळकर, हेमंत कांदळगावकर, गीता नेवाळे, शोभना चिंदरकर, माजी नगरसेविका पूजा करलकर, आकांक्षा शिरपुटे, तृप्ती मयेकर, सेजल परब, दीपाली शिंदे, साक्षी लुडबे, ममता लुडबे यांनी उपस्थिती दर्शवली. महिला लोकप्रतिनिधींनी स्पर्धेत भाग घेतला. मंडळाच्या वतीने पोलीस ठाणे मालवण, बंदर कार्यालय मालवण, विज वितरण मालवण, पंचायत समिती मालवण यांचे आभार मानण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी होण्या करीता योग्यरित्या नियोजन राबविण्यासाठी गणेश पाडगावकर, देवानंद लुडबे, ममता तळगावकर, स्नेहल मेथर, ममता कुबल, सौ. मृणाल मोंडकर, योगिता कुबल, देवानंद लुडबे, शुभदा पाडगावकर, योगेश्वर कुर्ले, निलेश चव्हाण, सरदार ताजर, विक्रम लुडबे, प्रवीण काळसेकर, यशवंत मेथर, जेम्स फर्नांडिस, बाबा मेंडीस, लक्ष्मीकांत परुळेकर, श्रीहरी खवणेकर, गणेश कुबल, नागेश मोंडकर, प्रफुल्ल खोत, यश मयेकर यांनी सहकार्य केले तर सूत्रसंचालन अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!