सिंधुदुर्गातील मुंबईस्थित शिवसैनिक व चाकरमान्यांची मुंबईत उद्या बैठक

पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख आ. वैभव नाईक, संजय पडते यांचे आवाहन

मालवण : शिवसेना संघटनात्मक बांधणीसाठी मुंबईत वास्तव्यास असलेल्या सिंधुदुर्ग वासियांची बैठक सोमवारी ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता शिशु विकास हाॅल, शिरोडकर हायस्कूल परेल, मुंबई येथे आयोजित केली आहे.

या बैठकीत शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, बदलापूर, अंबरनाथ, मीरा रोड, नालासोपारा आदी ठिकाणी वास्तव्यास असलेले शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व चाकरमानी जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुळ रहिवासी आहेत, त्यांनी बैठकीला मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आ. वैभव नाईक व संजय पडते यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3839

Leave a Reply

error: Content is protected !!