बाबा परब यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा ; युवा मोर्चाचा पुढाकार
धुरीवाडा प्रशाला, फातिमा कॉन्व्हेंटमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप ; ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप
मालवण | कुणाल मांजरेकर
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब यांचा वाढदिवस मालवण शहर भाजपा युवा मोर्चाच्या वतीने शनिवारी सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त धुरीवाडा प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. तर मेढा येथील फातिमा कॉन्व्हेंट मध्ये मुलांना फळे आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याशिवाय येथील ग्रामिण रुग्णालयात रुग्णांना फळे आणि पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले.
धुरीवाडा प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने वह्या वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दिपक पाटकर, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, खरेदी विक्री संघ चेअरमन आबा हडकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष ललित चव्हाण, दत्तात्रय केळुसकर, वसंत गावकर, सतीश धुरी, बाबू कासवकर, गणेश पाटील, शुभम लुडबे, पराग परब, गौरेश पराडकर, प्रथम सारंग उपस्थित होते.
त्याचप्रमाणे मालवण ग्रामीण रूग्णालयातील रुग्णांना फळे आणि पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले. आणि शहरातील फातिमा कॉन्व्हेन्ट येथील मुलांना फळे आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी येथील विद्यार्थी व सिस्टर यांनी बाबा परब यांच्या दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीसाठी प्रार्थना करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास भाजप युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, जिल्हा चित्रपट आघाडी उपाध्यक्ष अमित हर्डीकर, पंकज गावडे, कौस्तुभ किर्तने, कौशिक खवणेकर, आकाश गावकर, राजू भोगले, विपुल परब, गणेश पाटील आदी उपस्थित होते.