मालवणात ३१ शाळांचा १०० टक्के निकाल ; टोपीवालाची तन्वी चौकेकर तालुक्यात प्रथम
मालवण : मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यात तालुक्यातील ३१ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात येथील अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूलची विद्यार्थीनी तन्वी गणपत चौकेकर ही ९९.२० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम आली आहे. तर न्यू इंग्लिश स्कूल आचराची गौरी माधवराव भोसले ही ९७.८० टक्के गुण मिळवून द्वितीय, माध्यमिक विद्यालय बिळवसची सानिका श्रीराम पालव ९५.६० टक्के तर रोझरी इंग्लिश स्कूलची ईश्वरी उदय बागवे ही ९५.६० टक्के गुण मिळवून तृतीय आली आहे.
दहावीचा तालुक्याचा निकाल ९९.२० टक्के लागला आहे. यात १२५७ विद्यार्थ्यांपैकी १२४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ६१७ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य, ४३७ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, १३९ विद्यार्थ्यांनी द्वितीय तर १८ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण श्रेणी मिळविली आहे.
शाळानिहाय निकाल असा- अ. शि. देसाई टोपीवाला हायस्कूल- अनुक्रमे तन्वी चौकेकर (99.20 टक्के), स्नेहलता तेली (94.60 टक्के), मानसी करलकर (93.40 टक्के), राघव वझे (91.60 टक्के), श्रावणी पेडणेकर (90.60 टक्के), मृदूला देवगडकर (90.60 टक्के), रूद्र शिरोडकर (90.40 टक्के), विशाखा भिलवडकर (90.20 टक्के), गायत्री गावकर (90 टक्के), कुलदीप पांजरी (89.60 टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी, मुख्याध्यापक दत्तप्रसाद खानोलकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले आहे.
लक्ष्मीबाई देसाई टोपीवाले कन्याशाळा- सायली मिठबावकर (86.80 टक्के), श्रावणी आपकर (74.20 टक्के), निकीता शिरोडकर (70.60 टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष, पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले आहे.
रोझरी इंग्लिश स्कूल- ईश्वरी बागवे (95.60 टक्के), तनीषा गावकर (94.60 टक्के), भूमी देऊलकर (94.60 टक्के), आर्या गवारे (94.60 टक्के), प्रथमेश आचरेकर (93.80 टक्के), जेसिया नर्होंना (93.60 टक्के), एकता जाधव (93.60 टक्के),विश्लेषा मंडलिक (93.40 टक्के), भूमी आचरेकर (93.20 टक्के), रिद्धी वायंगणकर (93.20 टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले आहे.
श्री सद्गुरू सदानंद माऊली एज्युकेशन फाउंडेशन संचलित डॉ. एस. एस. कुडाळकर हायस्कूल- मनाली सावंत (82.60 टक्के), आरती पोखरणकर (81.40 टक्के), अनुष्का म्हापणकर (81 टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष, मुख्याध्यापिका नंदिनी साटलकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले आहे.
सौ. हि. भा. वरसकर विद्यामंदिर व वराड कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय- रूपाली करंगुटकर (87.20 टक्के), एकता मसुरकर (86 टक्के), पुंडलिक करलकर (85 टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे वराड ग्रामस्थ मंडळाचे अरूण गावडे, सर्व पदाधिकारी, सदस्य, शालेय समिती अध्यक्ष आप्पासाहेब परुळेकर, मुख्याध्यापक तानाजी पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले आहे.
वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय- समृद्धी गावडे (95.20 टक्के), प्रतिक्षा मेस्त्री (89.80 टक्के), मयुर चौहान (89.40 टक्के), मृदुला करावडे (89.40 टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष, पदाधिकारी, मुख्याध्यापक संजय नाईक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले आहे.
रेकोबा माध्यमिक विद्यालय- शुभम लुडबे (90.20 टक्के), विठ्ठल मिठबावकर (85.60 टक्के), प्राजक्ता लुडबे (84 टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष, पदाधिकारी, मुख्याध्यापिका सौ. शिंदोळकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले आहे.
आर. ए. यादव हायस्कूल आडवली- अनिकेत कदम (94.40 टक्के), श्रावणी मेस्त्री (89.90 टक्के), पार्थ पुजारे (86.40 टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष, पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले आहे.
जनता विद्यामंदिर त्रिंबक हायस्कूल- दुर्गेश घाडीगावकर (90.60 टक्के), मंदिरी मुणगेकर (89.80 टक्के), साविका सावंत (85.60 टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा समिती सदस्य, पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले आहे.
सौ. सुहासिनी श्रीधर परब खोटले हायस्कूल- प्रसाद पालव (89.80 टक्के), वेदिका गावडे (89.40 टक्के), योगिता पांचाळ (87.80 टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष आनंद सावंत, यशवंत परब, विश्वस्त मंडळ, शाळा समिती अध्यक्ष नंददिपक गावडे, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले आहे.
श्री शिवाजी विद्यामंदिर काळसे हायस्कूल- विनित प्रभू (93 टक्के), वेदिका प्रभू (92.20 टक्के), संस्कृती मालवणकर (88.20 टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष, पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले आहे.
त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे हायस्कूल- मनस्वी गावकर (95 टक्के), पूजा गावकर (93.20 टक्के), साथी गावकर (92.80 टक्के), वैभवी गावकर (92.60 टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष बाबू बाने अन्य पदाधिकारी, मुख्याध्यापक वामन तर्फे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले आहे.
श्रीदेवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट- राजकुमार दुखंडे (95 टक्के), संघमित्रा पवार (90.40 टक्के), सोहम पालव (90.20 टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष, पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले आहे.
भ. ता. चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय चौके- दिप्ती कुबल (95.20 टक्के), मृदुला गावडे (93.20 टक्के), मानसी कदम (91.40 टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे स्थानिक संस्थाध्यक्ष बिजेंद्र गावडे, पदाधिकारी, मुख्याध्यापक विजय गावकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले आहे.
भंडारी हायस्कूल- ओम भगत (91.40 टक्के), पूर्वा परब (90 टक्के), श्रेयस गुळवे (89.60 टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष विजय पाटकर, सुधीर हेरेकर, साबाजी करलकर, मुख्याध्यापक वामन खोत, संस्था पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले आहे.
जयगणेश इंग्लिश मिडीयम स्कूल- अनुश्री वराडकर (93.40 टक्के), आराध्य भिसे (93.20 टक्के), निनाद आरोंदेकर (92.40 टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष, सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले आहे.
न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर- भक्ती पाटील (94.80 टक्के), श्रृती पेडणेकर (91.80 टक्के), प्राची परब (91.20 टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष बाबाराव राणे, घनश्याम राणे, मुख्याध्यापक सुरेश तावडे, संस्था पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले आहे.
डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग- संतोष चिंदरकर (76.60 टक्के), एरोन फर्नांडिस (71.69 टक्के), साक्षी सादये (71.60 टक्के), मानसी वरक (70.80 टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष, पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले आहे.
रामेश्वर माध्यमिक विद्यामंदिर तळगाव- साईल मेस्त्री (90 टक्के), शंकर मांजरेकर (87 टक्के), सुहानी तळगावकर (86 टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष सूर्यकांत दळवी, आनंद दळवी, मुख्याध्यापिका शैलजा शिरोडकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले आहे.
ओझर विद्यामंदिर कांदळगाव- आर्या पारकर (92.20 टक्के), राधिका परब (87.40 टक्के), ऋत्विक बांदेकर (87.40 टक्के), हर्षद सुतार (84.20 टक्के), जयेश परब (83.60 टक्के), प्रिया भोगले (82.20 टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष शेखर राणे, मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एस. परब, संस्थाचालक उदय परब, शालेय समिती अध्यक्ष किशोर नरे, मुख्याध्यापक प्रतापराव खोत, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले आहे.
अॅड. गुरूनाथ कुलकर्णी न्यू इंग्लिश स्कूल माळगाव- श्रावणी साळकर (88.80 टक्के), अनुश्री हरकुळकर (87.60 टक्के), तेजस्वी तांबे (74.20 टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष, पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले आहे.
आर. पी. बागवे हायस्कूल मसुरे- मैथीली हडकर (90 टक्के), विभास वंजारे (87.20 टक्के), मधुरा हडकर (86.60 टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा समिती अध्यक्ष डॉ. दीपक परब, मुख्याध्यापक के. ए. चव्हाण, श्री. सावंत, महेश बागवे, सरोज परब, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले आहे.
वराडकर इंग्लिश मिडीयम स्कूल कट्टा- मानसी सावंत (85.40 टक्के), मनीषा आंदुर्लेकर (85.20 टक्के), गौरवी मिठबावकर (80.20 टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष, पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले आहे.
भरतगड हायस्कूल देऊळवाडा मसुरे- पूर्वा परब (85.80 टक्के), भाग्यश्री लाड (83.20 टक्के), श्रीराज परब (76.20 टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष डॉ. दीपक परब, महेश बागवे, श्री. सावंत, विठ्ठल लाकम, मुख्याध्यापक एस. आर. कांबळे, संस्था पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले आहे.
माध्यमिक विद्यालय बिळवस- सानिका पालव (95.60 टक्के), सौरभ परब (92.40 टक्के), सोहम पाताडे (89.40 टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष, पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले आहे.
सौ. ई. द. वर्दम पोईप हायस्कूल- आबाजी हिवाळेकर (88.20 टक्के), दिशा परब (87.60 टक्के), प्रत्युष भोगले (86.80 टक्के) गुण मिळवून यशस्वी झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष अनिल कांदळकर, विलास माधव, गोपीनाथ पालव, मुख्याध्यापक श्री. कांबळे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले आहे.