तारकर्ली दुर्घटनेतील ७ जणांवर उपचार सुरू : उपचारानंतर ११ जण घरी
कुणाल मांजरेकर
मालवण : तारकर्ली मधील बोट दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला. तर ७ जणांवर मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असून, ११ जणांना प्राथमिक उपचार देवून घरी पाठविल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी दिली आहे.
या दुर्घटनेत आकाश भास्करराव देशमुख (वय ३०, रा. शास्त्रीनगर अकोला), डॉ. स्वप्नील मारुती पिसे (वय ४१, आळेफाटा पुणे) अशी दोन मृतांची नावे आहेत. तर रश्मी निशेल कासुल (वय ४५ रा. ऐरोली, नवी मुंबई) यांच्यावर रेडकर हॉस्पीटल येथे, संतोष यशवंतराव (वय ३८, बोरिवली, मुंबई) यांच्यावर डॉ. अविनाश झांटये हॉस्पीटल येथे उपचार सुरु आहेत. तसेच मृणाल मनिष यशवंतराव (वय ८), ग्रंथ मनिष यशवंतराव (वय दीड वर्ष), वियोम संतोष यशवंतवराव (वय- साडेचार वर्ष), सर्व रा. बोरिवली मुंबई, वैभव रामचंद्र सावंत (वय ४० रा. वायरी तारकर्ली), उदय भावे (वय ४० ऐरोली, नवी मुंबई ) यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शुभम गजानन कोरगावकर (वय २२) शुभांगी गजानन कोरगावकर, (वय २६, रा. दोघेही केरवडे , कुडाळ) लैलेश प्रदिप परब (वय ३०), अश्विनी लैलेश परब (वय ३० रा. दोघेही कुडाळ). मुग्धा मनिष यशवंतराव (वय ४०) मनिष यशवंतराव (वय ४०) आयुक्तीे यशवंतराव (३१ रा. सर्व बोरिवली, मुंबई). सुशांत आण्णाासो धुमाळे (वय ३२), गितांजली धुमाळे (वय २८ रा. दोघेही जयसिंगपूर जि. कोल्हा पूर). प्रियन संदिप राडे (वय १४ रा. प्रज्ञानंद नगर, पुणे), व सुप्रिया मारुती पिसे (वय ३१ रा. पुणे) यांना प्राथमिक उपचार देवून घरी पाठविण्यात आले आहे.