उद्योजक महेंद्र पालव यांच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

पोईपमध्ये उपक्रम ; तीन प्रशालांमधील विद्यार्थ्यांना लाभ

पोईप ( प्रसाद परब)  : प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच चांगले शैक्षणिक साहित्य मिळाल्यास शिक्षणाची आवड निर्माण होते. साहित्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घ्यावे, असे प्रतिपादन साईसिद्धी कन्स्ट्रशनचे मालक उद्योजक महेंद्र पालव यांनी पोईप येथे आयोजित कार्यक्रमात केले.

पोईप येथील जि. प. प्राथमिक केंद्र शाळा नं. १, प्राथमिक शाळा भटवाडी, प्राथमिक शाळा धनगरवाडी या तीन प्रशालेतील विद्यार्थ्यांना उद्योजक महेंद्र पालव यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोईप गावचे सरपंच श्रीधर नाईक, पोईप विविध विकास  सोसायटीचे माजी चेअरमन शंकर(बाळा) पालव, माजी उपसरपंच विलास माधव, मिलींद नाईक, सत्यवान पालव, अनिकेत सावंत, अजय जाधव, मुख्याध्यापक विकास घाडीगावकर, शिक्षक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. यापुढे देखील गावातील विद्यार्थांना लागणारी मदत उपलब्ध करून देण्याची ग्वाही महेंद्र पालव यांनी दिली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!