“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेच्या अंमलबजावणीसाठी मालवण न. प. कडून कक्षाची स्थापना
अंगणवाडी केंद्र, न. प. कार्यालयात सोमवार पासून मिळणार मोफत अर्ज ; नोडल अधिकाऱ्यांचीही नियुक्ती : मुख्याधिकारी संतोष जिरगे यांची माहिती
मालवण | कुणाल मांजरेकर
महाराष्ट्र शासनाची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या निर्देशानुसार मालवण नगरपरिषद कार्यालयात मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या उपस्थितीत नगरपरिषद कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यानुसार मालवण नगरपरिषदेकडून महिला लाभार्थ्यांसाठी ऑनलाईन, ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच अंगणवाडी केंद्रावर व मालवण नगरपरिषद कार्यालय येथे मोफत अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
सोमवार पासून मालवण शहरातील अंगणवाडी केंद्रांवर अर्ज स्वीकृती केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. यात अंगणवाडी केंद्र वायरी अंबाजी शाळा श्रीमती अनुराधा रमेश पाटकर 9421190922, अंगणवाडी केंद्र रेवतळे जि.प.शाळा- श्रीमती दिपाली आरोंदेकर 9765661261, अंगणवाडी केंद्र दांडी श्रीमती राधिका मोरजकर 7588567355, अंगणवाडी केंद्र भरड मालवण श्रीमती शुभदा मोरे 7083291713, अंगणवाडी केंद्र आडवण मालवण श्रीमती सुवर्णा चव्हाण 9404830051, अंगणवाडी केंद्र महापुरुष वायरी, मालवण श्रीमती कांचन परब 9511968172 आदी ठिकाणांचा समावेश आहे. या योजनेची विहित कालमर्यादेत प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून भास्कर रामचंद्र राऊळ, मालवण नगरपरिषद (मो. 9021800331) यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तरी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेकरीता मालवण शहरातील पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी संतोष जिरगे यांनी केले आहे.