जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांकडून बोट अपघात जखमींची विचारपूस
… तर पुढील कारवाई करणार : जिल्हाधिकारी श्रीमती के. मंजुलक्ष्मी यांची माहिती
मालवण : तारकर्लीतील दुर्घटनेनंतर सायंकाळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयास भेट देत उपचार सुरू असलेल्या पर्यटकांची विचारपूस केली. स्कूबा डायव्हिंग करण्यास गेलेल्या पर्यटकांना लाईफ जॅकेट देण्यात आली नसल्याची माहिती मिळाली आहे. याबाबतची खातरजमा करून पुढील कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी श्रीमती मंजुलक्ष्मी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.