जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत महापुरुष रेवतळे संघाला विजेतेपद

मसुरे डांगमोडे येथील भवानी मातेच्या वार्षिक गोंधळा निमित्ताने आयोजन

मसुरे : सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि मालवण तालुका कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने व नवतरुण मित्रमंडळ डांगमोडे यांच्या वतीने भवानी मातेच्या वार्षिक गोंधळानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये मालवणच्या महापुरुष रेवतळे संघाने यंगस्टार कणकवली संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले. विजेत्या महापुरुष रेवतळे संघाला रोख रुपये १० हजार आणि चषक तर उपविजेत्या यंगस्टार कणकवली संघाला रोख रुपये ५ हजार आणि चषक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

आमदार वैभव नाईक यांचा सत्कार करताना माजी उपसभापती छोटू ठाकूर सोबत संदेश पारकर, हरी खोबरेकर आणि अन्य

तृतीय क्रमांक जय महाराष्ट्र संघ सावंतवाडी, चतुर्थ क्रमांक जय मानसीश्वर वेंगुर्ले याना प्रत्येकी रोख रुपये २ हजार आणि चषक प्रदान करण्यात आला. स्पर्धेतील बेस्ट रायडर शिवलिंग पाटील कणकवली, बेस्ट डिफेंडर कीर्तीयश परब मालवण, स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडू भक्तीयश साळगावकर वेंगुर्ला याना गौरविण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना युवा नेते संदेश पारकर आणि आमदार वैभव नाईक, सिने अभिनेत्री प्राजक्ता वाडये यांच्या उपस्थितीत पार पडले. पंच म्हणून तुषार साळगावकर, नितीन हडकर, दाजी रेडकर, अमित गंगावणे, किशोर पाताडे, प्रथमेश सावंत, हेमंत गावडे यांनी काम पाहिले. स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रसंगी नवतरुण मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग ठाकूर, माजी उपसभापती छोटू ठाकूर, उद्योजक संदेश ठाकूर, पोलीस पाटील सोमा ठाकूर, कामगार नेते हरी चव्हाण, रमेश ठाकूर, प्रकाश ठाकूर, अनिल ठाकूर, महेश ठाकूर, बुधाजी ठाकूर, अमित ठाकूर, स्वप्नील ठाकुर, समीर ठाकूर, पंकज ठाकूर, देविदास ठाकुर, गुरुनाथ ठाकूर, ओमकार ठाकूर, किशोर ठाकूर, सुभाष ठाकूर, बाळप्रकाश ठाकूर, प्रशांत चव्हाण, रमेश चव्हाण, परशुराम ठाकूर, कमलेश ठाकूर, रवी ठाकूर, परशुराम रामचंद्र ठाकूर, दादा डांगमोडेकर, मंगेश ठाकूर, राजेंद्र ठाकूर, सौरभ ठाकूर, बंटी ठाकूर, संजय ठाकूर, सुभाष ठाकूर आणि नवतरुण मंडळांचे सर्व सदस्य उपस्थित होते. स्पर्धेतील सर्व चषक कै. शिवाजी ठाकूर यांच्या स्मरणार्थ उद्योजक संदेश ठाकूर, छोटू ठाकूर यांनी पुरस्कृत केले होते.
सूत्रसंचलन दत्तप्रसाद पेडणेकर यांनी केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!