आ. नितेश राणे जामीन प्रकरणी सुनावणी पूर्ण ; उद्या निकाल

सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जाची सुनावणी मंगळवारी जिल्हा न्यायालयात पूर्ण झाली. याचा निकाल उद्या दिला जाणार आहे.

शिवसेनेच्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांना १८ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी ओरोस जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!