भाजपा कार्यकर्त्यानी सोडला निःश्वास : आ. नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी !
आता जामीनाची प्रक्रिया सुरू
कणकवली : सिंधुदुर्गच्या जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी जामीन फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज मागे घेत आमदार नितेश राणे बुधवारी कणकवली न्यायालयात शरण गेले आहेत. दरम्यान, कणकवली न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे. त्यामुळे त्यांच्या जामीनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, न्यायालयाच्या आदेशाचा आदर ठेवून मी शरण जात आहे. आतापर्यंत राज्य सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने मला बेकायदेशीर अटक करण्याचा प्रयत्न केला. मी स्वतः न्यायालयाचा आदर ठेवून कणकवली न्यायालयात हजर होत असल्याची प्रतिक्रिया आ. नितेश राणे यांनी न्यायालयात हजर होण्यापूर्वी दिली.
भाजपा आमदार नितेश राणे हे कणकवली न्यायालया समोर स्वतःहुन हजर झाले. बुधवारी दुपारी ३ वाजता ते कणकवली न्यायालया समोर हजर झाले. त्याच्या सोबत वकील संग्राम देसाई, वकील राजेंद्र रावराणे, वकील उमेश सावंत, वकील राजू परुळेकर उपस्थित आहेत. भाजपा पदाधिकारी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, नगराध्यक्ष समीर नलावडे, दिलीप तळेकर, सभापती मनोज रावराणे, संतोष कानडे, संदीप सावंत, मिलींद साटम उपस्थित होते. दरम्यान, त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांच्या जामिनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.