चौके येथे रुग्णवाहिका आणि पर्यटकांच्या ट्रॅव्हलरमध्ये अपघात

दोन्ही वाहनांचे नुकसान ; सुदैवाने कोणालाही दुखापत नाही

चौके : मालवण -कसाल मार्गावर चौके वावळ्याचे भरड येथील छोटया वळणावर गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मालवण येथून नाशिकला जाणाऱ्या पर्यटकांच्या टेम्पो ट्रॅव्हलर (MH 15 EF 6399) आणि मालवणच्या दिशेने येणाऱ्या खाजगी रुग्णवाहिकेची (MH07 AJ 6241) धडक होऊन अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. अपघातची खबर उशीरा मालवण पोलीस ठाणे येथे देण्याची प्रक्रिया सुरू होती.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!