महायुतीचे उमेदवार निलेश राणेंच्या प्रचाराचा माणगावच्या दत्त मंदिरातून शुभारंभ
शिवसेना उपनेते संजय आग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे काका कुडाळकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
माणगाव | कुणाल मांजरेकर
कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातील शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील श्री दत्त मंदिर येथून करण्यात आला. यावेळी निलेश राणे यांनी दत्त मंदिर, श्री देवी यक्षिणी मंदिर आणि टेम्बे स्वामींचे दर्शन घेतले. महायुतीचे उमेदवार निलेश राणे हे लाखाच्या मताधिक्याने निवडून यावेत असे साकडे यावेळी घालण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
माणगाव येथील दत्त मंदिर व श्री देवी यक्षिणीचे दर्शन घेऊन श्रीफळ अर्पण करण्यात आले. यावेळी दत्त मंदिर विश्वस्त मंडळ अध्यक्ष सुभाष भिसे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, भाजपचे सरचिटणीस रणजीत देसाई, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष काका कुडाळकर, प्रदेश सदस्य संध्या तेरसे, शिवसेनेच्या महिला अध्यक्षा वर्षा कुडाळकर, दीपलक्ष्मी पडते, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, भाजपचे जेष्ठ पदाधिकारी दादा बेळणेकर, भाजपचे निमंत्रक राजू राऊळ, प्रशांत राणे प्रदेश सदस्य बंड्या सावंत, संघटक रुपेश पावसकर, कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, राजन भगत, रुपेश कानडे शिवसेना तालुकाप्रमुख बंटी तुळसकर, अरविंद करलकर, सिद्धेश शिरसाट, ॲड विवेक मांडकुलकर, खरेदी-विक्री संघ अध्यक्ष दीपक नारकर, भाजप चिटणीस विनायक राणे, मोहन सावंत, आनंद शिरवलकर, कुडाळ नगरपंचायत भाजपा गटनेता विलास कुडाळकर, माजी नगरसेवक राकेश कांदे, माजी सभापती अभय परब, नागेश परब, सचिन धुरी, अविनाश राणे, आर. के. सावंत, भाई बेळणेकर, पांडू सावंत, दत्ता कोरगावकर, जोसेफ फर्नांडिस, केशव भरतू, सगुण धुरी, दीपक कानेकर, सचिन परब, सुरज नाईक, संजय नाईक आदी उपस्थित होते.