प्रीतम गावडे यांची युवासेना कुडाळ मालवण विधानसभा अध्यक्ष म्हणून नियुक्ती
मालवण : मालवण चौके येथील युवा नेते प्रितम गावडे यांची हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाच्या “युवासेना विधानसभा अध्यक्ष” (कुडाळ – मालवण) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
युवासेना महाराष्ट्र सचिव किरण साळी यांनी युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र प्रितम गावडे यांना सावंतवाडी येथील युवासेना कार्यक्रमांत सुपूर्द केले. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण आत्मसात करून शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे. आपल्या सामाजिक वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे. आपल्या सामाजिक व राजकिय क्षेत्रातील भावी वाटचालीस मनःपुर्वक शुभेच्छा, असे या नियुक्ती पत्रात म्हटले आहे. यावेळी युवासेना कोकण विभाग निरीक्षक राहूल अवघडे, युवासेना जिल्हाप्रमुख ऋत्विक सामंत, जिल्हाप्रमुख मेहुल धुमाळे, जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, युवती सेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, जिल्हा समन्वयक दिलीप सामंत, सोशल मीडिया प्रमुख हर्षद पारकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.