आमदार वैभव नाईक यांनी शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज केला दाखल
भगवे झेंडे, भगव्या शाली, भगव्या टोप्या परिधान केलेल्या शिवसैनिकांमुळे कुडाळात भगवामय वातावरण
कुडाळ : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आमदार वैभव नाईक यांनी शक्तीप्रदर्शन करीत गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कुडाळ शहरातील अनंत मुक्ताई हॉल समोरील पटांगणार आमदार वैभव नाईक यांची सभा पार पडली. सभा संपल्यानंतर कुडाळ शहरातुन मुख्य रस्त्याने प्रांताधिकारी कार्यालयाकडे शिवसैनिकांचा जनसमुदाय आमदार वैभव नाईक यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मार्गस्थ झाला. भगवे झेंडे, भगव्या शाली, भगव्या टोप्या परिधान करून ढोल ताशांच्या गजरात व डीजेच्या ठेक्यावर कुडाळ मालवणची जनता रॅलीत सहभागी झाली होती. त्यामुळे संपूर्ण कुडाळ शहराचे वातावरण भगवेमय झाले होते.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, माजी आमदार परशुराम उपरकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, माजी मंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, व्हिक्टर डांटस, प्रसाद रेघे, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट,आमदार वैभव नाईक यांच्या पत्नी स्नेहा नाईक, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख उपनेत्या जान्हवी सावंत, जिल्हाप्रमुख नीलम पालव, श्रेया परब, हरी खोबरेकर, राजन नाईक, बबन बोभाटे, मंदार केणी, यतीन खोत, अभय शिरसाट, सुशांत नाईक, कन्हैया पारकर, अतुल बंगे, सचिन कदम, बाळा कोरगावकर, अनुप नाईक, किरण शिंदे, संतोष शिरसाट, गणेश कुडाळकर तपस्वी मयेकर, संमेश परब, शिल्पा खोत, उदय मांजरेकर, योगेश धुरी, मंदार ओरसकर, पूनम चव्हाण, दीपा शिंदे, स्नेहा दळवी, मथुरा राऊळ,सुशील चिंदरकर, नितीन वाळके,श्रेया गवंडे आदींसह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते कुडाळ मालवणची जनता हजारोंच्या संख्येने उपस्थित होती.