मालवणात भरवस्तीत “हिट अँड रन” ; अज्ञात वाहनाचे चाक डोक्यावरून गेल्याने वृद्धाचा जागीच मृत्यू

सायंकाळी ७.३० वा. ची दुर्घटना ; पोलिसांकडून वाहनाचा शोध सुरु ; मृत बस स्थानकामागील रहिवाशी

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण शहरातील देऊळवाडा मार्गावर अज्ञात वाहनाचे चाक अंगावरून गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा होऊन सुभाष गुणाजी मांजरेकर (वय ७०, रा. एसटी स्टॅण्ड मागे मालवण) या वयोवृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली. भरवस्तीत झालेल्या या अपघाताच्या घटनेनंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. त्यामुळे अपघाताची घटना नेमकी कशी घडली, याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या.

दरम्यान, ज्या वाहना मुळे अपघात झाला ते वाहन नेमके कोणते? याबाबत चर्चा सुरु होत्या. बसचे चाक अंगावरून गेल्याची चर्चाही सुरु होती. एसटी अधिकारीही त्या ठिकाणी दाखल झाले. मात्र अपघात बसमुळे झाला याची खात्री झाली नव्हती. मालवण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दुर्घटनेचा पंचनामा करण्यात आला. याबाबत पुढील तपास सुरु आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!